Shivsena-Bjp
Shivsena-Bjp 
महाराष्ट्र

युतीचा फायदा होण्याची आशा

सकाळवृत्तसेवा

शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे संभाव्य मतविभाजन टळल्याने आणि शिवसैनिकांच्या मनातील खदखद यामुळे काँग्रेस आघाडीलाही फायदा होणार असल्याने दोन्ही काँग्रेसचे नेते खूष झाले आहेत. 

गेल्या साडेचार वर्षांपासून शिवसेना सत्तेत असूनही सरकारवर टीका करत होती. त्यामुळे एकप्रकारे विरोधकांची जागाही शिवसेनेने व्यापली होती. मात्र, आता युती झाल्याने शिवसेनेमुळे विरोधकांचे होणारे मतविभाजन टाळले जाईल, अशी आशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी असूनही भाजप व शिवसेनेचा नेहमीच ३६ चा आकडा राहिला आहे. युती न झाल्यास तर भाजपाविरोधातील मते शिवसेनेला मिळाली असती. तीच मते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे वळतील, अशी आशा या दोन्ही पक्षांना आहे.

शिवसैनिकांत घालमेल
युती झाल्याने सामान्य शिवसैनिकांच्या मनात घालमेल सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या विधानसभेला युती तुटल्यापासून सत्तेतील अपमानास्पद वाटा यामुळे सामान्य शिवसैनिक भाजपवर प्रचंड नाराज झाला होता. युती नकोच, नुकसान झाले तरी चालेल मात्र भाजपला धडा शिकवण्याची उघडपणे भूमिका स्थानिक शिवसैनिक मांडत होता. आता नेतृत्वानेच युतीचा निर्णय घेतल्याने सामान्य शिवसैनिकाची कोंडी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT