Kangana Ranaut on Eknath Shinde sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : अभिनेत्री कंगना रणौत CM शिंदेंना भेटणार; २०२४ च्या लोकसभेची तयारी?

एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर ही भेट होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे. २०२४ ला लोकसभेच्या निवडणुकीला कंगना उभं राहणार असल्याच्या चर्चांमध्ये होणाऱ्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कंगना रणौत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाने त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यावेळी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एकनाथ शिंदे यांचा एक फोटो शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहिलं होतं की, यशस्वी होण्याची ही एक प्रेरणादायी कथा आहे. रिक्षा चालवण्यापासून देशातल्या सगळ्यात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्त बनण्यापर्यंतचा प्रवास...तुम्हाला शुभेच्छा सर.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत ही भाजपाच्या समर्थनार्थ सातत्याने बोलत असते. २०२४ साली ती मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा आहेत. खासदार हेमा मालिनी यांनी याचविषयी एक विधानही केलं होतं. उद्या राखी सावंत जरी उभी राहिली तरी मथुरेतली जनता तिलाही निवडून देतील, असा टोला त्यांनी कंगना रणौतला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT