Teacher
Teacher 
महाराष्ट्र

#शिक्षकदिन : साडेआठ हजार शिक्षकांना शिक्षक दिनाची भेट

सकाळवृत्तसेवा

राज्यातील 738 शाळा व दोन हजार 55 तुकड्यांना 20 टक्के अनुदान मंजूर
सोलापूर - राज्यात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या आठ हजार 419 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आज शासनाने शिक्षक दिनाची अनोखी भेट दिली आहे. 738 शाळा व दोन हजार 55 तुकड्यांना 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बिनपगारी असलेल्या गुरुजींना शासनाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

शासनाने नऊ मे ला एक व दोन जुलैला अनुदानास पात्र असलेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला होता. मात्र, तरीही या बिनपगारी शिक्षकांना पगार देण्याबाबतचा शासन निर्णय निघत नव्हता. अनेक शिक्षक संघटनांनी हा निर्णय निघावा, यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने या शिक्षकांना शिक्षक दिनाची अनोखी भेट देताना एक एप्रिल 2018 पासून 20 टक्के अनुदान मंजूर केले आहे. अनुदानप्राप्त शाळांनी 19 सप्टेंबर 2016 मधील अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्‍यक असल्याचेही या शासनादेशात म्हटले आहे.

अद्यापही 551 शिक्षकांचा जीव टांगणीला
नऊ मेच्या शासनादेशामधून वगळण्यात आलेल्या राज्यातील 51 माध्यमिक शाळा व 19 माध्यमिक शाळांतील 54 तुकड्यांना अनुदान मंजूर केलेले नाही. या संस्थांमध्ये 551 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यादानाचे काम करीत आहेत. या शाळा व तुकड्यांची फेरतपासणी झाली आहे. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक, आयुक्त असा प्रवास करत या शाळांचा चौकशी अहवाल मंत्रालयात सादर झाला आहे. मात्र, या शाळांमधील शिक्षकांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने अद्यापही घेतला नाही. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या 551 शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.

आकडे बोलतात
अनुदान मंजूर झालेल्या शाळांची स्थिती
-प्राथमिक शाळा-158
-प्राथमिक शाळांच्या तुकड्या-504
-या दोन्ही शाळांवरील शिक्षक-1417
-माध्यमिक शाळा-580
-माध्यमिक शाळांच्या तुकड्या-1551
-या दोन्ही शाळांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी-7002
-एकूण-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी - 8419

कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच आहे. त्याचे कुठपर्यंत आले आहे पाहावे लागेल. मात्र लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT