महाराष्ट्र

शिवस्मारकाची रचना बदलण्याचा विचार; पुढे चार पर्याय

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचना बदलण्याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. याबाबत चार पर्याय समोर आले आहेत. 

शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची बैठक 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाली होती. त्या बैठकीत शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणाऱ्या अडचणींसोबतच अन्य पर्यायांचा विचारही करण्यात आला होता. गुजरातेत नर्मदा नदीच्या काठावर उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा उंच पुतळा उभारण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारताना घोडीचे पुढील दोन पाय हवेत आणि मागील पाय चबुतऱ्यावर दाखवावे लागणार आहेत. अरबी समुद्रातील हवेचा जोरदार प्रवाह पाहता, अशा पद्धतीची रचना अयोग्य वाटत असल्याचे मत समितीच्या काही सदस्यांनी व्यक्त केले आहे. याच बैठकीत सल्लागार समितीने घोडीच्या पायांत काही बदल करत, स्मारकाच्या तीन रचना सादर केल्या. 
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारावा, असा चौथा पर्यायही पुढे आला. विलेपार्ले येथे पश्‍चिम द्रुतगती महामार्गाजवळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या धर्तीवर अरबी समुद्रातील पुतळा असावा, असा पर्यायही समितीसमोर ठेवण्यात आला. या पर्यायांच्या प्रतिकृतींचे सादरीकरण समितीपुढे करण्यात आले. परंतु, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 

पटेल यांच्या स्मारकाहून अधिक उंच? 
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे साकारण्याचे निश्‍चित झाले; तर शिवस्मारकाची उंची 153 मीटर म्हणजे सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या 152 मीटर उंचीपेक्षा एक मीटर जास्त असावी, असे समितीने सुचवले आहे. सध्याच्या आरेखनानुसार शिवस्मारकाचा चबुतरा 88.8 मीटरचा असून स्मारकाची एकूण उंची 123.2 मीटर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT