Aamir Khan Son Junaid Khan Debut with Sai Pallavi
Aamir Khan Son Junaid Khan Debut with Sai Pallavi 
मनोरंजन

Aamir Khan Son Junaid : आमिरचा मुलगा जुनैद साऊथच्या साई पल्लवी सोबत? मिस्टर परफेक्शनिस्टचा 'मास्टरस्ट्रोक'?

युगंधर ताजणे

Aamir Khan Son Juniad Khan Debut with Sai Pallavi : एकीकडे आमिर खानच्या लाडक्या लेकीची आयराच्या लग्नाची चर्चा होत असताना दुसरीकडे लेकाच्या बॉलीवूड डेब्यूविषयी बोलले जात आहे. आमिरचा मुलगा जुनैद खान हा आता बॉलीवूडमध्ये इंट्री करणार आहे. त्याविषयी यापूर्वी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. साऊथच्या एका बड्या अभिनेत्रीसोबत दिसणार असल्याची चर्चा आहे.

आमिर खान हा बॉलीवूडमध्ये त्याच्या आगळ्या वेगळ्या स्टारडमसाठी ओळखला जातो. त्याचा चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षक आणि त्याचा चाहता त्यातून काही वेगळा आशय आपल्याला पाहायला मिळेल या अपेक्षेनं मिस्टर परफेक्शनिस्टचा चित्रपट पाहतो. त्याला मनापासून दादही देतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून आमिर हा त्याच्या चित्रपटांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

Also Read - सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

खरंतर आमिरनं त्याच्या त्या वक्तव्यावरुन माफीही मागितली होती. प्रेक्षकांना, चाहत्यांना गृहित धरणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय त्यांनी लाल सिंग चढ्ढाच्या निमित्तानं घेतला होता. यापुढील काळात आमिर हा एका बायोपिकमध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. आता त्याच्या मुलाची जुनैदच्या बॉलीवूड डेब्यू विषयी बोलले जात आहे. जुनैद हा साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीसोबत दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

यशराज फिल्ममधून तो डेब्यू करणार असून तो प्रोजेक्ट साई पल्लवी सोबत असणार आहे. ही एक लवस्टोरी असून त्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, जुनैदनं आपल्या बॉलीवूड इंट्रीची जोरदार तयारी केली असून त्यात मुख्य अभिनेत्री म्हणून साई पल्लवी दिसणार आहे. त्याचे दिग्दर्शन सुनील पांडे हे करणार आहेत.

यापूर्वी जुनैदनं नाट्य अभिनेता म्हणून काम केले आहे. त्यानं कौसर ठाकोर यांच्या ब्रटोल्ड ब्रेख्त यांच्या मदर करेज अँड हर चिल्ड्रन नावाच्या नाटकातून पदार्पण केलं आहे. त्याचीही चर्चा झाली होती. यानंतर तो आता चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. जुनैदविषयी सांगायचे झाल्यास त्यानं अमेरिकेतील अॅकडमी थिएटरमधून दोन वर्षे अभियनाचे प्रशिक्षणही घेतले आहे. याशिवाय त्यानं आमिरच्या पीके चित्रपटामध्ये असिस्टंट दिग्दर्शक म्हणून कामही केले होते.

साऊथच्या अभिनेत्रीसोबत जुनैदची इंट्री हा आमिरचा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे. साई पल्लवीचा टॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये असणारा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे जुनैदची इंट्री ही स्पेशल ठरणार आहे. असे बोलले जात आहे. त्याच्या या प्रोजेक्टविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

आमिरनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये जुनैदविषयी म्हटलं होतं की, त्यानं बॉलीवूडमध्ये कधी यावं हा त्याचा प्रश्न आहे. तो निर्णय त्यानं घ्यावा. मी त्याच्यासाठी कोणता निर्णय घेणार नाही. त्याचे आय़ुष्य असून तो निर्णय घ्यायला समर्थ आहे. तो खूप हुशार आहे. त्यानं चांगले शिक्षण घेतले आहे. त्याचा उपयोग आता त्यानं करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT