Nana Patekar Interview : 'सगळ्यांनी आपल्या घरातले आरसे फोडून टाकलेत म्हणून....' सध्याच्या राजकारणावर नानांनी केलं मार्मिक भाष्य

येत्या काळात नानांचा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सिन वॉर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Nana Patekar Exclusive Interview The Vaccine War Movie
Nana Patekar Exclusive Interview The Vaccine War Movie esakal

Nana Patekar Exclusive Interview The Vaccine War Movie : मराठी हिंदी चित्रपट, नाट्यसृष्टीतील मोठं व्यक्तिमत्व, प्रसिद्ध नाव म्हणून नाना पाटेकर यांच्याकडे पाहिलं जातं. चित्रपटसृष्टीमध्ये ठामपणे आपली भूमिका मांडणारे म्हणून जे कुणी कलाकार आहेत त्यात नानांचे नाव अग्रक्रमानं घ्यावे लागेल. गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ आपल्या नावाची छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे.

येत्या काळात नानांचा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सिन वॉर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्तानं सकाळनं नानांशी संवाद साधला. यावेळी नानांनी या चित्रपटाच्या प्रवासाविषयी सांगितले.तसेच त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर देखील खास आपल्या शैलीत भाष्य केले आहे. नानांची ती मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Also Read - https://www.esakal.com/premium-article

नाना त्या व्हिडिओमध्ये म्हणतात, त्या भयाण दिवसांत सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील लोकं ज्या प्रकारे काम करत होती, त्यांचे आयुष्य कसे होते हे थक्क करणारं आहे. त्यांना तातडीनं त्या आजारावरील व्हॅक्सीन शोधून काढायचं होतं. त्यात महिलांचा वाटा मोठा आहे. मला या चित्रपटामध्ये डॉ.बलराम भार्गव यांची भूमिका करण्याची संधी मिळाली. तो स्वभावानं कडक माणूस आहे.त्याला परिस्थितीनं तसे घडवले आहे.

Nana Patekar Exclusive Interview The Vaccine War Movie
The Vaccine War: फक्त एक रुपया एवढचं मानधन घेतलं! कोण आहेत 'डॉ.बलराम भार्गव'?

यासगळ्या जीवघेण्या संकटात व्हॅक्सिन कसं तयार केलं त्याचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. मी चित्रपट निवडताना त्याचा विषय काय आहे, त्याची गोष्ट काय आहे, ती करणारी माणसं कोण आहेत याचा विचार मी करतो. मी आता ७३ वर्षांचा आहे. त्यामुळे मी आणखी किती काम करणार हा मुद्दा आहे. पण ज्यांच्यासोबत काम करतो आहे ते काय सांगू पाहतात हे जास्त महत्वाचे आहे. असेही नानांनी यावेळी सांगितले.

नानांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, मी एक सामान्य व्यक्ती आहे. सामान्य व्यक्तीच्या मनात जे प्रश्न येतात तेच माझ्याही मनात येतात. त्यावर मी बोलतो. आपण सगळ्यांनी बोलायला हवं. जोपर्यत तुम्हाला म्हणजे राजकारण्यांना सर्वसामान्यांची भीती वाटत नाही तोपर्यत त्यांची मनमानी ते करतील.

Nana Patekar Exclusive Interview The Vaccine War Movie
Jawan in Kashmir: अतिरेकी भाग म्हणुन ओळखला जाणाऱ्या जम्मूमधील हंदवारा हॉलमध्ये होणार स्पेशल स्क्रिनींग

मुळामध्ये आपण सुधारलो पाहिजे. त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करु नका. आपण आपल्याला कधी सुधारणार, गोंधळ तिथे होतो आहे. सगळ्यांनी आपआपल्या घरातले आरसे फोडून टाकले आहे. अशा शब्दांत नानांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली आहे.

Nana Patekar Exclusive Interview The Vaccine War Movie
Nana Patekar : 'आता मी म्हातारा झालोय'! नाना असे का म्हणाले? कोणत्या गोष्टीचा आला राग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com