मनोरंजन

Bigg Boss Marathi 3: किर्तनकार शिवलीलाची अंतिम सोहळ्यात गैरहजेरी; वाचा कारण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा अंतिम सोहळा सध्या सुरु आहे. अवघ्या काही वेळातच आपल्याला 'बिग बॉस मराठी 3' चा विजेता कोण? हे समजणार आहे. विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या सर्वोत्तम पाचमधून अंतिम विजेत्याची निवड करण्यात येणार आहे. टॉप पाच स्पर्धकांतून मिनलचा आणि उत्कर्षचा पत्ता कट झाला आहे. आता उर्वरित स्पर्धक विशाल निकम, विकास पाटील आणि जय दुधाणे यांच्यामधील कोण बिग बॉसच्या घराचा विजेता होतोय, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. या महाअंतिम पर्वाला बिग बॉस मराठीच्या या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी हजेरी लावली आहे. मात्र, यामध्ये एक नाव अनुपस्थित आहे आणि ते म्हणजे किर्तन करणारी शिवलीला पाटील होय. शिवलीलाने या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला देखील हजेरी लावण्याचं टाळलं आहे. तिने असं का केलं, याचं कारण तिच्या बिग बॉस मराठीच्या एकूण प्रवासामधून स्पष्ट होतं. तिचा प्रवास कसा होता, ते आपण पाहूयात...

सर्वांत वादग्रस्त स्पर्धक

किर्तनकार शिवलीला पाटील (Shivleela Patil) ही 'बिग बॉस मराठी ३' च्या (Bigg Boss Marathi 3) घरातील सर्वांत वादग्रस्त सदस्य ठरली होती. प्रकृतीच्या कारणास्तव ती बिग बॉसच्या घरातून काही दिवसांतच बाहेर पडली होती. मात्र पहिल्या दिवसापासून शिवलीला विविध कारणांमुळे चर्चेत राहिली होती. शोमध्ये भाग घेण्यावरून ट्रोल होण्यापासून ते अचानक बाहेर पडण्यापर्यंत, शिवलीलाचा सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये चर्चेत होती. किर्तनकार शिवलीलाने बिग बॉससारख्या शोमध्ये भाग घेऊन चुकीचा निर्णय घेतला असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. "तुम्ही इतरांना ज्ञान शिकवता आणि स्वत: असा निर्णय घेता, हे चुकीचं आहे", अशा शब्दांत शिवलीलावर टीका करण्यात आली होती.

कसा राहिला 'बिग बॉस मराठी'मधील प्रवास?

तृप्ती देसाई आणि शिवलीला यांच्यात वाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाईसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तृप्ती देसाईंनी शिवलीलाचे गुरू इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. किर्तनात महिलांना कमी लेखल्याने देसाईंनी हे पाऊल उचललं होतं. यावरून बिग बॉसच्या घरात तृप्ती देसाई आणि शिवलीला यांच्यात वाद झाला. कामगिरी न केल्याने तिला नॉमिनेट करण्यात आलं होतं. शिवलीला या खेळासाठी योग्य स्पर्धक नसून तिने बिग बॉसमध्ये सहभागी होऊ नये, अशी इच्छा इतरांनी व्यक्त केली.

नॉमिनेशननंतर शिवलीलाचं भावनिक वक्तव्य नॉमिनेशननंतर भावूक झालेली शिवलीला म्हणाली होती की, “मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे, इथे फक्त काड्या, कुचर्‍या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले, तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन, त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल”.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT