Akshay kumar In Mahakal:  Esakal
मनोरंजन

Akshay kumar In Mahakal: वाढदिवसानिमित्त अक्षय सहकुटुंब पोहचला महाकाल दरबारात! क्रिकेटर शिखर धवनचीही हजेरी

वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार शनिवारी सकाळी भगवान महाकालच्या भस्म आरतीसाठी उज्जैनला पोहोचला.

Vaishali Patil

Akshay kumar In Mahakal: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय 9 सप्टेंबर रोजी त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार शनिवारी सकाळी भगवान महाकालच्या भस्म आरतीसाठी उज्जैनला पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत भारतीय क्रिकेटर शिखर धवनही महाकाल दरबारात दिसला.

अक्षयने भगवान महाकालच्या दरबारात देवाचा आशिर्वाद घेतला. तो भस्म आरतीमध्ये महाकालच्या भक्तीत लीन झालेला दिसला. यावेळी क्रिकेटर शिखर धवननेही भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली.


अक्षय धोती सोला तर आरव पांढऱ्या कुर्ता पायजमात होता. अक्षय कुमार, कुटुंबीय आणि शिखर धवन नंदी हॉलमध्ये बसून पुरी भस्म आरती पाहताना दिसले. यावेळी सर्वजण शिवपूजन करण्यात मग्न दिसून आले. अक्षय कुमारने बाबांची भस्मी आणि काळेवा प्रसाद म्हणून घेतला. गर्भगृहात प्रवेश बंद झाल्यामुळे त्यांनी गर्भगृहाच्या दाराच्या चौकटीवर नतमस्तक होऊन पूजा व आरती केली.

श्री महाकाल मंदिराचे पुजारी पंडित आशिष गुरू यांनी सांगितले की, अभिनेता अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह वाढदिवसानिमित्त बाबा महाकालच्या भस्म आरतीला आला होता, त्याने बाबा महाकालच्या या दिव्य भस्म आरतीचे दर्शन घेतलं आणि नंदी हॉलमध्ये महाकालची पूजा केली. यावेळी त्याच्यासोबत मुलगा आरव, भाची सिमर आणि बहीण अलका हिरानंदानीही उपस्थित होते.

तर मीडियासोबत बोलतांना अक्षय कुमार म्हणाला की, त्याने देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे. त्याला क्रिकेट विश्वचषकाबाबत प्रश्न विचारला असता अक्षय कुमार म्हणाला की विश्वचषक ही भगवान महाकालसाठी खूप छोटी गोष्ट आहे. देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी त्यांने पार्थना केली आहेत. एक खास गोष्ट म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचा मुलगा आरव पारंपरिक पोशाखात दिसले.

वर्क फ्रंटवर बद्दल बोलायचं झाल्यास अक्षय शेवटचा OMG 2 चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचे शूटिंगही उज्जैनमध्ये झाले आहे. अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अक्षय आजही त्याच्या एका चित्रपटाची घोषणा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT