actor ashutosh rana corona positive  Team esakal
मनोरंजन

व्हॅक्सिन घेऊनही आशुतोष राणाला झाला कोरोना; पोस्ट व्हायरल

आता बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता आशुतोष राणा याला कोरोना झालायं.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींना कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यातील मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी शासनानं प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आता बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता आशुतोष राणा याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याविषयी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. येत्या काळात कोरोनाचा उद्रेक आणखी वाढणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी य़ावेळी केले आहे.

राणा यांनी सांगितले की, सहा एप्रिलला मी कोरोनाचे व्हॅक्सिन घेतलं होतं. तरीही मला कोरोना झाला आहे. मी आणि पत्नीनं कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं होतं. त्यावेळी राणा यांची पत्नी रेणूका शहाणे यांनीही व्हॅक्सिनेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. राणा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, आजपासून भारतीय नववर्षाला प्रारंभ होत आहे. यावेळी दुर्गा मातेचे स्मरण केले जाईल. मात्र आजच्या अशा शुभ दिवशी मला कोरोना झाल्याचे कळले. त्यावेळी वाईट वाटले. आपल्याला काय झाले आहे याची वेळेवर माहिती मिळणे यासारखा शुभ योगायोग नाही.

ज्यावेळी मला कळले की कोरोना झाला आहे त्यानंतर मी या आजारातून मुक्त कसे व्हायचे याचा विचार करु लागलो. त्यावेळी मला माझ्या गुरुजींची आठवण झाली. मी आता माझ्या संपूर्ण परिवाराची टेस्ट केली आहे. त्या सगळ्यांचा रिपोर्ट उद्या येणार आहे. मात्र माझ्या संपर्कात आलेल्या सर्व मित्रांनी आपली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन राणा यांनी केले आहे. यापूर्वी अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

माधुरीची ब्युटी, नोराचा तोरा, मेरा पिया घर आया वर थिरकल्या 'डान्सिंग क्वीन'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महसूल मंत्र्यांच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक; बावनकुळेंचं नाव घेऊन मागितले पैसे, शेतकऱ्याला QR Code पाठवला अन्...

"तुझी खूप आठवण येईल" सायली पाठोपाठ ठरलं तर मगच्या टीमची पूर्णा आजीसाठी पोस्ट; निर्मातीही झाली भावूक...

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात मुंबई हायकोर्टच्या सर्किट बेंचचे भव्य उद्घाटन

ठाकरेंची शिवसेना शिंदेंना देणारे निवडणूक आयुक्त बेपत्ता?, जगदीश धनकडही... देश हादरवणारा आरोप, कुठं गेले हे लोक?

Viral Video : तरुणीने विनाकारण मारली थप्पड, तरुणाने 'असा' घेतला बदला; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

SCROLL FOR NEXT