Actress Deepika Padukone First Look Of Chhapaak Movie Is Out
Actress Deepika Padukone First Look Of Chhapaak Movie Is Out 
मनोरंजन

अॅसिड हल्ला झालेल्या तरुणीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण

सकाळवृत्तसेवा

अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने आपल्या चित्रपटात काम करावे किंवा आपल्या कथेतील भूमिकेला दीपिकाच न्याय देऊ शकते, हे खरं तर दिग्दर्शकांना वाटणे सहाजिकच आहे. कारण दीपिकाने आजपर्यंत केलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याच आहेत. अगदी 'ओम शांती ओम', 'लव आज कल', 'कॉकटेल' ते अलिकडच्या काळातील 'रामलीला', 'बाजीवराव मस्तानी', 'पद्मावत', 'पिकू' अशा प्रत्येकच चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये स्वतःला आजमावल्यानंतर दीपिका एका संवेदनशील भूमिकेतून आपल्याला भेटणार आहे.

या संवेदनशील भूमिकेतील दीपिकाचा पहिला लूक सध्या व्हायरल होत आहे. ही भूमिका आहे अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल या तरुणीची. लक्ष्मी च्या जीवनावर आधारीत 'छपाक' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात लक्ष्मीची भूमिका दीपिकाने साकारली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर दीपिकाने आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहे. मेघना गुलजार या 'छपाक'चे दिग्दर्शन करत आहे. 

लक्ष्मीच्या भूमिकेत स्वतःला जगासमोर आणताना दीपिका म्हणते, 'या चित्रपटात साकारत असलेली मालतीची भूमिका माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे.' 

 



'मालती'च्या भूमिकेत दीपिकाचा चेहरा अॅसिड हल्ला झालेल्या तरुणीसारखाच दिसत आहे. अॅसिड हल्ला झाल्यानंतर लक्ष्मीने स्वतःला सावरत कशाप्रकारे संघर्ष केला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला हे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होईल.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

SCROLL FOR NEXT