actress nafisa ali birthday special love story with husband ravinder singh sodhi  
मनोरंजन

'सासूला पसंत नव्हते, नव-याच्या मित्राच्या घरी संसाराची सुरुवात'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आता आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या कोणेएकेकाळी मिस इंडिया होत्या. त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींबरोबर काम केले आहे. त्या अभिनयाबरोबरच राजकारणातही तितक्याच सक्रिय आहेत. मात्र एवढं सगळं असतानाही त्यांना त्यांच्या सासूनं नाकारलं होतं. याच कारण म्हणजे त्या त्यांना आवडत नव्हत्या.

अभिनेत्री नफीसा अली यांचा आज वाढदिवस. 18 जानेवारी 1957 रोजी त्यांचा जन्म झाला. त्या आता 64 वर्षांच्या आहेत. नफीसा यांचे जीवन सुरुवातीपासून फार खडतर राहिले आहे. त्यांनी जोपर्यत आपल्याला हव्या त्या क्षेत्रात यश मिळत नाही तोवर प्रयत्न करत राहायचा ही त्यांना घरातूनच मिळालेली शिकवण म्हणता येईल. त्यामुळे आयुष्याला धाडसानं सामोरं जाताना कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याचे धैर्य त्यांनी अंगी बाणवले होते. त्या एका मुस्लिम कुटूंबातून आल्या होत्या. त्यांनी लग्न केलं ते एका शीख व्यक्तीशी. आता कौटूंबिक संघर्षाला सामोरं जाण्याचा प्रसंग ज्यावेळी त्यांच्यावर ओढावला त्यावेळी त्या गांगरल्या नाहीत. हे सगळं निभावून नेणं त्यांच्यासाठी कष्टप्रद होते.

एक वेळ अशी आली होती की, नफीसा यांना आपल्या पतीचे घर सोडून त्यांच्या मित्रांच्या घरी राहण्यासाठी जावे लागले होते. अशावेळी मित्र धावून आले. नफीसा आणि त्यांचे पती रविंदर सिंग सोढी यांच्यात प्रेम होते. मात्र त्यावेळी त्यांच्या लग्नाला कोणी तयार नव्हते. परिवाराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यावरुन मोठा वाद झाला होता.रवींदर यांच्या आईला मुलानं एका मुस्लिम मुलीशी लग्न करणे अजिबात पसंद नव्हते. परंतु रविंदर आणि नफीसा अली हे एकमेकांच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होते.

परिवारांतील व्यक्तींचा वाढणारा विरोध लक्षात घेता त्यांनी कोलकाता येथे नोंदणी पध्दतीनं विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. नफीसाला त्यांच्या आईनं घरात यायला नकार दिला होता. त्यामुळे त्यांना पती रणवीर यांच्या मित्राच्या घराचा त्यांना आसरा घ्यावा लागला. त्यानंतर नफीसा यांच्या सासूचे मोठे भाऊ हे नफीसा यांच्याकडे आले आणि त्यांनी नफीसा यांची माफी मागितली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाइट अन् लिंक व्हायरल; वेळीच सावध व्हा, नाहीतर बसेल मोठा फटका

Sunday Evening Snack: संध्याकाळच्या भूकेची करा अशी सोय, चहासोबत तयार करा लेफ्टओव्हर पोळीच्या बाकरवडी

Madhuri Elephant Return : महादेवी हत्तीण महाराष्ट्रात परत येणार? खासदारांनी कोल्हापूरकरांना दिली मोठी खुशखबर

Crime: 'फ्रेंडशिप डे'लाच मैत्रीच्या नात्याला काळिमा! मान दाबली, मांडीवर सिगारेटचे चटके अन्...; तरुणाचं मुलीसोबत संतापजनक कृत्य

धक्कादायक! 'ऊस देऊन आठ महिने उलटले तरी दमडी नाही'; जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही आडमुठेपणा, मुलांची शिक्षणे थांबली

SCROLL FOR NEXT