मनोरंजन

रकुल प्रीत सिंग झाली 'डॉक्टर जी': लूक Viral

युगंधर ताजणे

मुंबई - रकुल प्रीत सिंह (rakulpreet singh) पहिल्यांदा आयुष्मान खुरानासोबत जंगली पिक्चर्सच्या कॅम्पस कॉमेडी ड्रामा 'डॉक्टर जी'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, ज्यामध्ये, शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी नुकताच चित्रपटातील रकुलचा बहुप्रतीक्षित 'फर्स्ट लुक'चे अनावरण केले. 'डॉक्टर जी' या चित्रपटातील डॉक्टर फातिमाची व्यक्तिरेखा सहज वाटण्यासाठी, रकुलला अनुभूति कश्यप दिग्दर्शित या कौटुंबिक मनोरंजकपटासाठी मेडिकल टर्मोनोलॉजी आणि काही महत्वपूर्ण सर्जिकल प्रक्रियांबाबतच्या डेटेलिंग्जचा देखील अभ्यास करावा लागला. ऑपरेशन्स आणि इतर वैद्यकीय जगाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टींना स्क्रीनवर प्रामाणिकपणे दाखवण्यासाठी, निर्मात्यांनी रकुल, आयुष्मान, शेफाली यांना आपल्या व्यक्तीरेखेच्या तयारीचा भाग म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी तज्ज्ञांसोबत खास सेशन्स आयोजित करण्यात आली होती.

आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना रकुल म्हणाली की, '''डॉक्टर जी'चे चित्रीकरण हा एक सुंदर अनुभव राहिला आहे. यामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका साकारत असल्यामुळे, यातील व्यवहार आणि काम परफेक्ट असणे आवश्यक होते. स्क्रीनवर वास्तविक दिसण्यासाठी मेडिकलशी निगडित मुख्य गोष्टी जाणून घेणे अनिवार्य होते. डॉक्टर फातिमा बनण्याचा प्रवास ही एक अद्भुत प्रक्रिया होती जी मी नेहमीच माझ्याजवळ जपून ठेवू इच्छिते.” “आम्हाला फातिमाचे वास्तविक दिसणे आवश्यक वाटत होते. योग्य लुकसाठी आम्ही अनेक लुक टेस्ट केल्या त्यामागे विचार हा होता कि हे यथासंभव वास्तविकतेच्या जवळ जायला हवे आणि व्यक्तिरेखेतील मृदुता समोर आणेल. केवळ डॉक्टरचा एप्रण घालून तुम्हाला अचानक जबाबदारीची जाणीव होऊन जाते, भले ही मी केवळ एक व्यक्तिरेखा साकारत होते. सीन्ससाठी रुग्ण तपासताना, कोणालाही हे सहज समजून येईल की वास्तवात डॉक्टरांच्या खांद्यावर किती जबाबदारी असते आणि त्यांचे जीवन किती कसोटीपूर्ण असते.

अनुभूति कश्यप दिग्दर्शित, 'डॉक्टर जी' एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे, ज्याचे सह-लेखक सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच प्रयागराजमध्ये एक व्यापक शूटिंग शेड्यूल पूर्ण केले असून चित्रपट या महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होणार आहे. सुशांत सिंगच्या मृत्युनंतर अनेक सेलिब्रेटी चर्चेत आले होते. त्यात अभिनेत्री रकुल प्रीतचाही समावेश होता. तिचेही चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणही समोर आले होते. तेव्हापासून रकुलप्रीतवरही वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT