मनोरंजन

सुष्मिताच्या 'आर्या'ला एमीचं नामांकन : नवाझुद्दीनचाही समावेश

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेननं (sushmita sen) आर्या वेबमालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. तिची ती पहिलीच वेबसीरिज होती. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आली. आता त्या मालिकेचा जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला आहे. तिच्या आर्या नावाची मालिका यंदाच्या इंटरनॅशनल एमी अॅवॉर्डसाठी 2021 International Emmy Awards) नामांकित झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिचं अभिनंदनही केलं आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी (Nawazuddin Siddiqui) आणि वीर दास (Vir Das) यांना देखील नामांकन मिळाले आहे. इंटरनॅशनल अॅकेडमी ऑफ टेलिव्हिजन कला आणि विज्ञान कॅटेगिरीमध्ये सुश्मिताच्या मालिकेला नामांकन मिळाले आहे.

नवाझुद्दीन सिद्धीकाला त्याच्या सिरियस मेन नावाच्या चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे. त्या कॅटगिरीमध्ये ब्रिटिश स्टार डेविड टेनेंट (डेस) याच्यासह रॉय निक (नॉर्मली) आणि कोलंबियाच्या क्रिश्चियन टप्पन (एल रोबो डेल सिग्लो) या अभिनेत्यांचाही समावेश आहे. सुधीर मिश्रा यांनी सिरीयस मेनचे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटाचे लेखन मनु जोसेफ यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. तो एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे यापूर्वी नवाझुद्दीननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होत. आपल्या मुलाच्या आनंदासाठी एखादा बाप काय करु शकतो, त्यासाठीचा त्याचा संघर्ष यासगळ्या गोष्टी त्यात मांडण्यात आल्या होत्या. प्रेक्षकांनी त्याचे कौतूक केले होते. त्यातील नवाझुद्दीनच्या अभियाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यात प्रखर जात वास्तवही मांडण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात त्या चित्रपटावर टीकाही झाली होती. मात्र समीक्षकांनी त्याची अभ्यासु मांडणी करुन सीरियस मेनचं कौतूक केलं होतं.

आर्याचं दिग्दर्शन राम माधवानी यांनी केलं होतं. डिझ्नी हॉटस्टारची निर्मिती असणाऱ्या या मालिकेनं सुश्ंमिताला वेगळी ओळख मिळवून दिली. तिची ही पहिलीच मालिका होती. वास्तविक आर्या हा प्रसिद्ध क्राईम ड्रामा पेनोजाचा रिमेक आहे. मात्र त्याला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी जूनमध्ये ही मालिका प्रदर्शित झाली होती. आता त्याच्या दुसऱ्या सीझनचे काम सुरु आहे. सुश्मिताच्या चाहत्यांना या मालिकेच्या दुसऱ्या सीझनचे वेध लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT