'जेम्स बाँड' डॅनियेल क्रेग रॉयल नेवीच्या कमांडरपदी

हॉलीवूडमध्ये जेम्स बाँड (James Bond) मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला.
'जेम्स बाँड' डॅनियेल क्रेग रॉयल नेवीच्या कमांडरपदी

मुंबई - हॉलीवूडमध्ये जेम्स बाँड (James Bond) मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला. आतापर्यत वेगवेगळ्या अभिनेत्यांनी जेम्स बाँडची भूमिका केली आहे. त्यातील अनेकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यापैकी डॅनियल क्रेगची (Daniel Craig) सध्या मोठी हवा आहे. त्याची युनाटेड किंग्डमच्या रॉयल नेवीच्या मानद कमांडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियावर यासंबंधी डॅनियलनं एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात त्यानं याविषयी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांसापासून डॅनियल चर्चेत आहे. त्याच्या आगामी बाँडपटाचे प्रेक्षकांना वेध लागले आहे. यावेळी डॅनियलनं आपल्याला जो सन्मान मिळाला आहे त्याविषयी आनंद व्यक्त केला आहे. मोठ्या गर्वानं मी सर्वांना सांगू इच्छितो की, आज मी मोठं यश संपादन केलं आहे. अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे.

30 सप्टेंबरला डॅनियल क्रेगचा नवा बाँडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षभरापासून त्याची चर्चा होती. अखेर तो चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बाँडपटाकडून त्याला मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. त्याचा मागील बाँडपट हा फारसा प्रभावी ठरला नाही. मात्र त्यातील त्याच्या अभिनयाचं कौतूक झालं होतं. वास्तविक बाँडपट म्हटला की, त्याच्या हिट होण्याची शक्यता ही गृहित धरली जाते. आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. डॅनियलला ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचे मानद कमांडर पद मिळाले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जेम्स बाँडच्या अधिकृत व्टिटरवरुन डॅनियलच्या गौरवाची माहिती देण्यात आली आहे. त्यानं रॉयल नेव्हीच्या युनिफॉर्मचा फोटोही शेयर केला आहे. याविषयी डॅनियलनं लिहिलं आहे की, अशा प्रकारे देशाची सेवा करायला मिळणं हा मी माझा बहुमान समजतो. आता पर्यत प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे. आता पुन्हा एकदा नव्या प्रकारची जबाबदारी मिळाल्यानं मी आनंदी आहे.

'जेम्स बाँड' डॅनियेल क्रेग रॉयल नेवीच्या कमांडरपदी
जिला बहीण म्हणायचे, मौलाना तिच्याच प्रेमात पडले: अभिनेत्रीनं केलं लग्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com