swara bhaskar
swara bhaskar  Team esakal
मनोरंजन

'भविष्यात काही खरं नाही', गाजियाबाद व्हिडिओ प्रकरण

युगंधर ताजणे

मुंबई - उत्तर प्रदेशातील गाजियाबाद (gaziabad video case) मध्ये झालेल्या एका घटनेमुळे सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. त्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता त्या व्हिडिओवर अभिनेत्री स्वरा भास्करनं (actress swara bhaskar) प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. दुसरीकडे तिलाही अनेकांनी ट्रोल केले आहे. स्वरानं आपल्या व्टिटमध्ये येत्या काळात देशाचे भविष्य काही उज्जवल वाटत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली आहे. ( actress swara bhaskar tweeted future does not look bright ghaziabad video case )

स्वरा (swara) आणि आणखी काहीजणांविरोधात दिल्लीतील एका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. स्वरा सध्या आपल्या नव्या घरात जाण्याची तयारी करत आहे. तिनं सकाळीच एक व्टिट केले आहे. त्यात तिनं म्हटलय, आता सकाळचे पावणे सहा वाजले आहेत. आणि मी छान मॅगीही (maggy) बनवली आहे. ती खात आहे. मला असे वाटते की, माझे भविष्य काही उज्ज्वल दिसत नाही. तिचं हे व्टिट अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

सोशल मीडियावर 14 जून रोजी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात एका वयोवृध्द मुस्लिम व्यक्ती अब्दुल समद सैफी यांनी आरोप केला होता, काही युवकांनी त्यांना मारहाण केली होती. आणि त्यांना बळजबरीनं जय श्री राम म्हणण्यास प्रवृत्त केले. असा आरोप त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरेही व्यक्त केली जात आहेत.

मात्र या प्रकरणात गाजियाबाद पोलिसांनी सांगितले, या घटनेमध्ये कुठल्याही दोन धर्मांमध्ये कसल्याही प्रकारचा वाद झालेला नाही. सोशल मीडियावर जी माहिती प्रसारित केली जात आहे त्यात भावना भडकावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनी उगाच या गोष्टीचा वेगळा अर्थ लावू नये. सामाजिक शांतता ठेवण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.

गाजियाबाद ग्रामीण पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, सैफीला मारहाण केल्याप्रकरणी आता कल्लु गुर्जर. प्रवेश गुर्जर आणि आदिल यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आणखी चार जणांचा याप्रकरणात शोध घेत आहे. लोगो पोली, हिमांशु, आरिफ आणि मुर्शिद अशी त्यांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT