actress tejaswini lonari out from Bigg Boss Marathi 4 house evicted for medical reason sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मोठा धक्का! तेजस्विनी लोणारीला थेट बाहेरचा रस्ता.. कारण..

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता.. घरच्यांना अश्रु अनावर..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi s 4: बिग बॉस मराठी ४ आता मोठ्या रंजक वळणावर आलं आहे. घरात आता चार वााइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. बिग बॉसच्या खेळाचा कडक अनुभव असलेले सगळे मातब्बर आहेत हे चौघे. त्यातील एक राखी सावंत जिला हिंदी बिग बॉसचा दोन वेळा अनुभव आहे, दुसरा विशाल निकम जो बिग बॉस ३ चा विजेता आहे तर आरोह आणि मीरा हे बिग बॉस ३ मधले चांगले तगडे स्पर्धक. त्यामुळे यांच्या येण्याने आणि वागण्याने आता घरातील इतर सदस्यांची अवस्था सळो की पळो झाली आहे. अशातच घरच्यांना एक मोठा धक्का बसला आहे.

(actress tejaswini lonari out from Bigg Boss Marathi 4 house evicted for medical reason)

बिग बॉस मराठीच्या घरात आज असे घडले ज्यामुळे सगळ्या सदस्यांच्या अश्रूचा बांध फुटला. अभिनेत्री टेजस्विनी लोणारीला घराबाहेर जावे लागले. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घर सोडून जाणे अपिरहार्य आहे असे बिग बॉसने तीला संगितले. बिग बॉस यांनी तेजस्विनीला confession रूममध्ये बोलावले... आणि तीला हा धक्कादायक निर्णय ऐकवला.

बिग बॉस तीला म्हणाले की, "तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता, या क्षणी सोडावे लागेल...'' हे ऐकताच घरात शांतता पसरली... किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे यांना अश्रू अनावर झाले. कोणाचाच विश्वास यावर बसत नव्हता. रहिवासी संघावर नेम प्लेट लावण्यावरून जे तेजस्विनी आणि राखी मध्ये वाद झाले होते ते आपल्या सगळ्यांनाच आठवले... तेजस्विनीने जेव्हा तिच्या नावाची पाटी काढली तेव्हा राखी म्हणाली "हि जागा तुझी आहे"...

बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता 50 दिवस उलटले आहेत. दिवसेंदिवस स्पर्धा अधिकच कठीण आणि रंजक होत चालली आहे. घरातले ग्रुप फुटून आता प्रत्येकजन आपापल्या पद्धतीने खेळी करून पुढे जात आहे. गेली काही दिवस तेजस्विनीचे अनेकांशी खटके वाजले. अमृता धोंगडे ही तिची जवळची मैत्रीण असतानाही त्यांच्यात टोकाचे वाद झाले. तर तेजस्विनी आणि अपूर्वा चांगल्या मैत्रिणी झाल्या. त्यामुळे तेजुने घराचा निरोप घेताना सर्वांना अश्रु अनावर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT