Actress Urmila Matondkar is back in marathi film indusrty with madhuri film
Actress Urmila Matondkar is back in marathi film indusrty with madhuri film 
मनोरंजन

'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरचा नवा मराठी सिनेमा; पहा फर्स्ट लूक

सकाळवृत्तसेवा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. उर्मिला मातोंडकरचे पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर मीर यांनी ‘माधुरी’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल असणारे मोहसिन अख्तर मीर यांच्यासाठी मराठमोळ्या पत्नीचा मराठी सिनेमा निर्मित करणे ही त्यांच्यासाठी नक्कीच खास बाब असेल. मोहसिन अख्तर मीर यांना मराठी सिनेमांप्रती आवड आहे. कोणत्याही कामाला जेव्हा एक कलाकृती म्हणून सादर करायचे असते तेव्हा ‘स्पेशल कनेक्शन’ गरजेचे असते आणि मोहसिन अख्तर मीर आणि मराठी सिनेमा-मुंबईमध्ये एक ‘स्पेशल कनेक्शन’ आहे. यावरुन प्रेक्षकांना ‘माधुरी’च्या रुपातून एक सुंदर कलाकृती पाहायला मिळेल असं बोलल्या जात आहे. 

एका सुंदर नात्यावर गुंफलेला ‘माधुरी’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक निखळ आणि अर्थपूर्ण मनोरंजनाची मेजवानी असेल. या सिनेमात उर्मिला मातोंडकरने कोणती भूमिका साकारली आहे आणि या सिनेमाची कथा काय आहे याविषयीची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. पण सिनेमाची पहिली झलक उर्मिला मातोंडकरने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. तिने सिनेमाच्या फर्स्ट लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेर्स्टन आउटफिटमध्ये गिटार वाजवताना दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT