‘Adipurush’ postponed Om Raut announces new release date of Prabhas, Saif Ali Khan starrer sakal
मनोरंजन

Adipurush: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची रिलीज डेट ढकलली पुढे..

'आदिपुरुष'बाबत दिग्दर्शक ओम राऊत यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

नीलेश अडसूळ

Adipurush New Release Date: 'तान्हाजी' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाची सर्वजन आतुरतेने वाट पाहत होते. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले. चित्रपटात वापरण्यात आलेले VFX आणि रावणाची भूमिका यावरून या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं. कदाचितहाच वाद ओम राऊतला चांगलंच महागात पडला असल्याचे बोलले जात आहे. कारण या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

आज ओम राऊतने एक पोस्टर शेयर करत चित्रपट प्रदर्शनाची तारीख पूढ ए ढकलली असल्याचे जाहीर केले. एकीकडे या चित्रपटवर वाद सुरू असतानाच निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलल्याने चर्चांना उधाण आले आहे. आता हा सिनेमा पुढील वर्षात जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ओम राऊतने पोस्ट शेयर करत म्हंटलं आहे की, ''आदिपुरुष, हा फक्त सिनेमा नाही तर श्रीरामावरील आपल्या भक्तीचे, इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव मिळणार आहे. पण त्यासाठी आणखी थोडा वेळ देणे गरजेचे आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर भारतीयांना नक्कीच अभिमान वाटेल. तुमचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद यापुढेही असेच राहुदेत.'' असे त्याने म्हंटले आहे. या आधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता.

'आदिपुरुष' या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहेत. 'आदिपुरुष' हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट मध्यंतरी वादात अडकला होता आता मात्र या टीकेची दखल घेऊन निर्माते यात सुधारणा करणार असे दिसते आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT