payal 
मनोरंजन

घराणेशाहीवर पायल रोहतगी भडकली, आयुष शर्मावरुन सलमानवर साधला निशाणा

सकाळवृत्तसेवा

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडचा घराणेशाही हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सुशांतने अनेकदा हे बोलूनही दाखवलं होतं की त्याचा या इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही. सुशांतच्या आत्महत्येला घराणेशाही जबाबदार असल्याचं म्हणत अभिनेत्री कंगना रनौतने सगळ्यात आधी  निशाणा साधला. नंतर या मुद्द्याला अशी हवा मिळाली की ट्विटरवर हॅशटॅग नेपोटिजम ट्रेंड होतोय. या सगळ्यात आता पायल रोहतगी देखील उतरली आहे. पायलने थेट सलमान खान आणि बॉलीवूडच्या गँगवरंच निशाणा साधलाय. इतकंच नाही तर तिने सलमानचा मेव्हणा आयुष शर्माच्या बॉलीवूडमधील एंट्रीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पायल रोहतगी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बॉलीवूडमधील काही लोकांवर निशाणा साधत त्यांच्या अश्रुंना मगरमच्छ के आसु असं म्हटलंय. तिचे तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'सुशांत सिंग राजपुतच्या मृत्युवर बॉलीवूडच्या मोठ्या हस्ती मगरमच्छ के आसू दाखवत आहेत. कारण त्यांना बिईंग ह्युमन दिसण्याचं नाटक करायचं आहे. या दुटप्पी लोकांना सुशांत कोणत्या परिस्थितीतून जात होता हे माहित नव्हतं का? ते तर सुशांतचे मित्र होते? करण जोहरने सांगितलं की तो स्वतः १ वर्ष सुशांतच्या संपर्कात नव्हता. मी विचारु इच्छिते की असं का? ही लॉबी काय केवळ स्टारकिड्सना ब्रेक देणार का? त्यांच्याकडे टॅलेंट नसलं तरीही?'

इतकंच बोलून पायल थांबली नाही तर तिने तिच्या ट्विटरवरुनही सलमान खानवर घराणेशाहीचे आरोप केले. 'राम राम जी, आयुष शर्माला सलमान खानने लॉन्च केलं कारण त्याने त्याच्या बहीणीसोबत लग्न केलं होतं. यासाठी नाही की त्याच्यात टॅलेंट होतं. अतिशय टॅलेंटेड अभिनेता यासाठी गेला कारण त्याला गँगकडून वाळीत टाकण्यात आलं.'

तिच्या या ट्वीटमध्ये ते दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्यात एकावर लिहिलं आहे की सलमान खानने विचारलं होतं की कोण आहे हा सुशांत? तर दुस-यावर सुशांतच्या जाण्यानंतर सलमानने केलेल्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. 

after sushant singh rajput death payal rohatgi lashes out at salman khan for launching ayush sharma

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT