मुंबई : तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. 'तान्हाजी' बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता अजय पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे. 'RRR' या सिनेमासाठी त्याने घेतलेलं मानधनं वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करणार. झालंही तसंच! तान्हाजीने 250 कोटींची कमाई केली आहे. तान्हाजीचं नाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर झालं. नव्या वर्षाची दमदार सुरुवात केल्यानंतर आता तो पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या 'RRR' या आगामी सिनेमात तो झळकणार आहे.
तान्हाजीने केलेल्या कमाईनंतर अजयची डिमांड आणखीच वाढलेय. साहजिकच तो सिनेमासाठी बक्कळ मानधन घेणार. पण, यावेळी चित्र काहीसं वेगळचं आहे. 'RRR' या सिनेमामध्ये अजय ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत दिसणार आहे. त्यांच्याइतचे मानधन अजयलाही मिळणार होते. नवभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, मैत्री खातर या सिनेमासाठी अजयने कोणतेही मानधन घेतले नाही.
'बाहुबली : द बिगनिंग' आणि त्यानंतर 'बाहुबली : द कन्क्लुजन' या राजामौलींच्या क्रिएशनने सर्वांनाच थक्क करुन केले होते. हे चित्रपट देशात नाहीतर जगभरातून पाहिले गेले. त्यांनी कमाईचे रेकॉर्ड मोडले. त्यानंतर राजामौली आता 'RRR' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. यामध्ये अजय देवगण, राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी 8 जानेवारी 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषेत रिलिज होणार आहे.
अजय आणि राजामौली यांचं नातं...
‘ईगा’ चित्रपटाचं दिग्दर्शन राजामौली यांनी केलं होतं. या सिनेमाच्या सेटवरच अजय देवगण आणि राजामौली यांची भेट झाली होती. हाच सिनेमा हिंदीमध्ये 'मख्खी' म्हणून रिलिज झाला. हिंदीमधील डबिंग अजय देवगण आणि काजोलने केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.