Alia Bhatt received a special message from Ibrahim Ali Khan,Reveal In 'Koffee with karan 7' show Google
मनोरंजन

लग्नाआधी आलियाला सैफच्या मुलाचा पर्सनल मेसेज,म्हणालेला,'खास वेळ काढून मी..'

Koffee with karan 7 मध्ये आलिया गेस्ट म्हणून आली असताना इब्राहीम अली खानच्या त्या मेसेज संदर्भात तिनं खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या आलिया भट्टनं(Alia Bhatt) रियल लाइफमधील एक भन्नाट किस्सा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सिझनमध्ये ऐकवला. यावेळी आलियासोबत रणवीर सिंगही(Ranveer Sing) गेस्ट म्हणून करणच्या शो मध्ये उपस्थित होता. दोघांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून प्रोफेशनल लाइफपर्यंतचे सगळे किस्से शेअर केले. त्याचवेळी आलियानं हा मजेदार किस्सा शेअर केला. हा किस्सा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानशी जोडलेला आहे.(Alia Bhatt received a special message from Ibrahim Ali Khan,Reveal In 'Koffee with karan 7' show)

'कॉफी विथ करण ७' च्या शो मधील रॅपिड राऊंड मध्ये करण जोहरने आलियाला संजय लीला भन्सालींचा सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' संदर्भात काही प्रश्न विचारले. गंगूबाई भूमिकेसाठी आलियाला कोणी सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट दिली अशी विचारणा केली. यावर आलियाने इब्राहिम अली खानचे नाव घेतले. आलियानं एवढचं नाही तर आपल्या फोनवर त्यानं केलेला तो पर्सनल मेसेज वाचूनही दाखवला. आलिया इब्राहिम अली खानच्या त्या मेसेजला वाचताना हसून हसून लोटपोट झाली.

इब्राहिमनं आलियाला लिहिलेल्या त्या मेसेजमध्ये लिहीलं होतं की,''तुला हा पर्सनल मेसेज पाठवताना खास वेळ मी काढला आहे. मला विश्वास होत नाही की,ही तिच स्त्री आहे का,जिच्याकडून सेटवर मी खूप गोष्टी शिकतो,तू खरंच कमाल आहेस. गंगूच्या भूमिकेत तू जादू केलीयस आणि रानीची तुझी व्यक्तिरेखा शूट होताना जवळून पाहिल्यानंतर या सिनेमाला पाहिल्यावर मी असं म्हटलं तर अतिश्योक्ती ठरणार नाही की,कुठल्याही भूमिकेत तू स्वतःला फिट बसवतेस,जसं पाणी ज्या भांड्यात पडेल त्याचा आकार घेतं अगदी तसं. खूप अभिमानास्पद,या देशातील सर्वोत्तम अभिनेत्री''.

आलियानं इब्राहिमचा तो मेसेज वाचल्यावर करण जोहर आणि रणवीर सिंग लोटपोट हसले. इब्राहिम सध्या करण जोहरच्याच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करीत आहे. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT