Koffee With Karan 7:आलियाचं लग्न पण वडील महेश भट्ट रागावलेले, करणचा खुलासा Mahesh Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koffee With Karan: What Made Mahesh Bhatt Angry At Daughter Alia Bhatt’s Wedding?

Koffee With Karan 7:आलियाचं लग्न पण वडील महेश भट्ट रागावलेले, करणचा खुलासा

१४ एप्रिल २०२२ हा खास दिवस ठरला कारण त्या दिवशी बॉलीवूडचं क्यूट कपल आलिया भट्ट(Alia Bhatt)-रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांचं लग्न झालं. गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीतीलच नाही तर यांच्या कुटुंबियांना,चाहत्यांना देखील या लव्हबर्ड्सनी लग्न करावं असं वाटत होतं. अखेर हे बॉलीवूडचं मोठं लग्न पार पडलं अन् सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण कदाचित हे आपल्याला माहीत नसावं की या खास दिनी आलियाचे वडील ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट(Mahesh Bhatt) मात्र नाराज होते. पण असं कय बरं झाले असेल की मुलीच्या लग्नाच्या दिवशीच वडील नाराज?(Koffee With Karan: What Made Mahesh Bhatt Angry At Daughter Alia Bhatt’s Wedding?)

हेही वाचा: 'पण मी कार्तिक आर्यनच आहे',युरोपात अभिनेत्यावर आधारकार्ड दाखवण्याची वेळ

'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावून शोला चारचॉंद लावले. शो मध्ये आलियाच्या वैवाहिक जीवनावर खूप चर्चा झाली. कपूर कुटुंबाची सून झाल्यावर आलियाच्या आयुष्यात काय बदललं,रणबीरनं कसं तिला प्रपोज केलं....अशा अनेक करणने विचारलेल्या प्रश्नांवर आलियानं उत्तरं दिली. याचवेळी करणनं बोलता बोलता एक मजेदार खुलासा केला. करण जोहरनं एक मोठं सीक्रेट सर्वांना सांगून टाकलं. करण म्हणाला की,महेश भट्ट यांनी आलियाच्या लग्नाच्या दिवशी खूप मजेदार वक्तव्य केलं होतं आणि ते करताना ते रागावले होते.

हेही वाचा: 'कॉफी विथ करण 7' च्या पहिल्या भागातच कंगनावर करणचा पलटवार,म्हणाला...

आलियाला नवरीच्या रुपात पाहून मुलीकडचे सगळेच भावूक झाले होते. त्यावेळचा एक किस्सा सांगताना करण म्हणाला,''लग्नाच्या दिवशी सगळ्यांना भावूक झालेलं पाहून महेश भट्ट म्हणाले होते,लग्नाच्या दिवशी मुलीकडच्यांचे चेहरे असे न बघण्यासारखे का असतात? हा रडवा लूक का असतो चेहऱ्यावर? बघा आपले चेहरे जरा''. तेव्हा पूजा भट्टनं त्यांना समजावून सांगितलं की, ''पप्पा तसं काही नाही,सगळे फक्त भावूक झालेयत''. आलियाला देखील वडीलांनी या चिडून केलेल्या वक्तव्याबद्दल काही माहित नव्हतं. तेव्हा लगेच आलियानं उगाचचा लटका राग दाखवत रिप्लाय देत म्हटलं,'पप्पा ,तुम्ही असं म्हणालात?'

हेही वाचा: सुश्मिता सेनच्या भावाला घटस्फोट का देतेय चारु असोपा? व्हिडीओतून मोठा खुलासा

आलिया आणि रणवीरनं 'कॉफी विथ करण' च्या ७ व्या सिझनचं ओपनिंग दमदार केलं, करण जोहरने दोन्ही स्टार्सना खूप मजेदार प्रश्न विचारले. करण समोर या दोन्ही सेलिब्रिटींनी आपल्या आयुष्यातील खूप वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Web Title: Koffee With Karan What Made Mahesh Bhatt Angry At Daughter Alia Bhatts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top