Alia Bhatt Reveals She will officially change her name Google
मनोरंजन

आलियानं घेतला नाव बदलण्याचा मोठा निर्णय; म्हणाली,'आता मी भट्ट नसेन तर...'

आपल्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असलेली आलिया भट्ट आता नाव बदलत असल्यानं, तिचं नवीन नाव 'आलिया कपूर' असणार असे अंदाज लोक लावताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Alia Bhatt: आलिया भट्ट(Alia Bhatt) सध्या आपल्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे, ती आयुष्यातील हा सुरु होणारा नवा प्रवास सध्या मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. आलिया आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार आहे. आपल्या बाळाचं वेलकम करण्याच्या तयारीसोबतच आलिया आता आणखी एका तयारीमध्ये व्यस्त आहे. जाणून घ्या नेमकी कसली तयारी करतेय ते.(Alia Bhatt Reveals She will officially change her name)

आलिया भट्ट आपलं नाव बदलण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहे. पण हे नाव बदलणार म्हणजे आलिया भट्ट आता आलिया कपूर होणार,तर मग ते लोक स्विकारतील का पटकन, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असेल,पण आलियानं थोडं वेगळ्या पद्धतीनं आपलं नाव बदलायचं ठरवलं आहे.

आलियानं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं की,मी आता कपूर कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे लवकरच मी आता अधिकृत रित्या कपूर होईन. मी माझ्या नावासोबत आता कपूर नाव जोडेन, आणि मला हे करताना खूप आनंद होत आहे.

रणबीर कपूरने आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर आपल्या पासपोर्टवर मॅरिटल स्टेटस बदललं होतं.याविषयी बोलताना आलिया म्हणाली, ''आता आमचं बाळ लवकरच येईल. आता मला भट्ट राहायचं नाही. कपूर कुटुंब खूप मोठं आणि एकत्र कुटुंब आहे,तुम्हाला कळालं असेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. मला लेफ्ट आऊट असल्यासारखं त्यांच्यात फील नाही करायचं. आलिया पुढे म्हणाली-मी नेहमीच आलिया भट्ट राहीन,पण आता त्या भट्ट नावापुढे कपूर नाव असेल''.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' सिनेमा लवकच रिलीज होत आहे, दोघंही यानिमित्तानं पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघांनाही एकत्र पडद्यावर पहायला अर्थातच त्यांचे चाहते उत्सुक आहेत. सिनेमात रणबीर-आलियासोबत अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमातील गाणी रिलीज झाली आहेत,आणि त्यांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, आता 'ब्रह्मास्त्र'ला लोक किती पंसत करतात हे रिलीजनंतर कळेल.

आलिया भट्टच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'डार्लिंग्ज'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नेहमीप्रमाणेच तिच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली. आता पहायचं 'ब्रह्मास्त्र' मधून आलिया काय कमाल दाखवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कॅबिनेट बैठकीला सुरुवात, पेपरफुटी प्रकरणावर चर्चा होणार?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT