Boycott Liger वर विजय देवरकोंडाचं सडेतोड उत्तर; म्हणाला,'गरज नाही कोणाची..'

विजय देवरकोंडाने 'लाल सिंग चड्ढाला' पाठिंबा दिल्यानं ट्वीटरवर 'Boycott Liger' ट्रेन्डला जोरदार सुरुवात झाली आहे.
As ‘Boycott Liger’ trends, Vijay Deverakonda tweets a cryptic post
As ‘Boycott Liger’ trends, Vijay Deverakonda tweets a cryptic postGoogle

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या त्यांच्या 'लाइगर'(Liger) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोघांनाही लोकांचे प्रेम आणि पाठिंबाही मिळताना दिसत आहेत. पण दुसरीकडे जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'ला बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला आणि सिनेमा वादात पडला. आणि त्यानंतर सिनेमाला बॉक्सऑफिसर चांगलाच फटका बसला. आता अचानक सोशल मीडियावर 'बॉयकॉट लाइगर' ट्रेंड सुरु झालं आहे. काही लोक याचं कारण करण जोहर आहे असं म्हणत आहेत तर काही म्हणतायत विजयचं लाल सिंग चड्ढाला पाठिंबा देणं त्याला महाग पडलं आहे. आता यावर विजय देवरकोंडाने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.(As ‘Boycott Liger’ trends, Vijay Deverakonda tweets a cryptic post)

As ‘Boycott Liger’ trends, Vijay Deverakonda tweets a cryptic post
22 वर्षांपूर्वीचं करिनाचं 'बुरखा प्रेम' समोर; सोशल मीडियावर चर्चेला उधाण...

टॉलीवूडचा हार्टथ्रोब विजय देवरकोंडाने नुकतेच त्याच्या लाइगर सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केल्यानंतर एक ट्वीट केले आहे. त्याचे हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विजयने खरंतर तेलुगु भाषेत हे ट्वीट केले आहे. पण बातमी आहे की विजयने या ट्वीटच्या माध्यमातून बॉयकॉट करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

As ‘Boycott Liger’ trends, Vijay Deverakonda tweets a cryptic post
'मला मराठीत कामच देत नाहीत'; कारण सांगत स्पष्टच बोलला संतोष जुवेकर...

विजय देवरकोंडाने आपल्या ट्वीटमध्ये बॉयकॉट ट्रेन्डचा काही उल्लेख केलेला नाही. त्यानं लिहिलं आहे, ''तो या लढाईसाठी तयार आहे. तो या लढाईत कोणाचीच पर्वा करणार नाही''. अभिनेत्याने लिहिलं आहे की,''जेव्हा आपण धर्माला अनुसरून वागतो तेव्हा आपल्याला इतर कोणाची पर्वा करायची गरज नाही,मी पुन्हा लढेन''. ट्वीट मध्ये त्याने फायर इमोजी देखील टाकला आहे. आणि पुढे #Liger असं लिहिलं आहे.

As ‘Boycott Liger’ trends, Vijay Deverakonda tweets a cryptic post
रक्षाबंधनही फ्लॉप झाला तसा अक्षयनं बदलला सूर; म्हणाला,'मी चुकलो,यापुढे...'

आता तुम्ही विचार नक्कीच कराल इतकं प्रेम आणि पाठिंबा मिळत असताना विजय देवरकोंडाला 'लाइगर'साठी बॉयकॉटचा का सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बॉयकॉट लाइगर ट्रेंड सुरू केलं याचं कारण अनेक जण करण जोहर असल्याचं म्हणत आहेत. तर काही लोक विजयने बॉयकॉट ट्रेन्डविषयी बोलताना लाल सिंग चड्ढाला पाठिंबा दिला यानं नाराज आहेत.

विजयनं लाल सिंग चड्ढा आणि बॉयकॉट ट्रेन्डविषयी बोलताना म्हटलं होतं, ''जेव्हा आमिर खान लाल सिंग चड्ढा बनवतात तेव्हा त्या सिनेमाशी फक्त ते जोडेल जात नाहीत तर त्यांच्यासोबत २ ते ३ हजार कुटुंबांचा रोजगार जोडला जातो. जेव्हा आपण एखादा सिनेमा बॉयकॉट करतो तेव्हा आमिरवर त्याचा फारसा परिणाम होत नाही पण त्या हजारो कुंटुंबांना मात्र नक्कीच फरक पडतो,त्यांच्या रोजगारावर घाला बसतो''.

As ‘Boycott Liger’ trends, Vijay Deverakonda tweets a cryptic post
'भूलभूलैय्या' 2 च्या यशानंतर कार्तिक आर्यननं वाढवलं मानधन, चर्चा आहे की...

विजय देवरकोंडाचा 'लाइगर' सिनेमा २५ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथने केले आहे. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे जो तब्बल पाच भाषात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विजय बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे तर अनन्या पांडे टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com