Alia cooks food in her house shared diet secrete
Alia cooks food in her house shared diet secrete  
मनोरंजन

आलियाने पहिल्यांदाच बनवलं जेवण, पाहा व्हिडीओ !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच फिटनेसलाही तितकचं महत्त्व आहे. त्यामुळे बॉलिवूडचे सेलिब्रिटी जीममध्ये मेहनत करताना दिसतात. आलिया भटही तिच्या फिटनेस आणि डाएटसाठी खूप जागरुक आहे. आलियाच्या सुपरफिट फिगरचं रहस्य आहे तरी काय हे जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांना इच्छा आहे. आलियाचं स्वत: चं युट्युब चॅनल आहे. ज्यावर ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते. नुकतचं तिने कुकींग करतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. आलियाचं स्वत: चं घर आहे आणि तिने या घरात व्हिडीओच्या निमित्ताने पहिल्यांदाच जेवण बनवलं आहे.  जाणून घ्या आलियाने या व्हिडीओमध्ये चाहत्यांसोबत कोणती रेसिपी शेअर केली आहे. 

'आलिया भट्स किचन' या सिरिजचा पहिला एपिसोड शेअर करताना आलियाने स्वत: किचनमध्ये काही हेल्दी रेसिपि बनवल्या. आलियाचा शेफ दिलिप आणि हाऊसकिपर कॅरोल यांच्यासोबत तिने रेसिपी बनवल्या आहेत. आलियाच्या फ्रिजवर हेल्दी खाण्याच्या गोष्टींची लिस्ट आहे. त्यामध्ये भाज्या, सुप, सॅलेड, ब्रेकफास्ट, स्नॅक्स या सर्व पदार्थांची लिस्ट आहे. काही पदार्थ तिच्या आवडीचे आहेत. 

या व्हिडीओमध्ये आलिया बिटरुट सॅलेड आणि शिया पुडींग हे दोन हेल्दी पदार्थ बनवते. कशाप्रकारे हे हेल्दी पदार्थ झटपट तयार करता येतात आणि त्याची रेसिपी काय आहे हे आलियाने चाहत्यांशी शेअर केले आहे. व्डिडीओमध्ये आलिया सांगते, ''बिटरुट सॅलेड, राजमा सॅलेड, शिया पुडींग, खिचडी हे मला खूप आवडतं."

आलिया तिच्या खाण्याच्या आवडीनिवडी शेअर करताना सांगते,' मला खाणं खूप आवडतं. त्यातूनही भारतीय पदार्श माझे फेवरेट आहेत. टोमॅटोची भाजी, बटाटा फ्राय, वेगवेगळ्या प्रकारच्या रोटी त्यामध्ये जवारी रोटी, बाजरीची रोटी हे माझे आवडीचे पदार्थ आहेत.'

आलियाचा हा कुकींग व्हिडीओ मजेशीर आहे. तिच्या चाहत्यांनी त्याला भरभरुन पसंती दिली आहे. आलिया सध्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूरसोबतचा तिचा हा पहिला चित्रपट असणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी मे महिन्यात 2020 ला रिलिज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT