Alia Baby Girl
Alia Baby Girl esakal
मनोरंजन

Alia Baby Girl: 'मुलगी झाली आलिया-रणबीरला'! पण करण जोहर का होतोय ट्रोल?

सकाळ डिजिटल टीम

Alia Baby Girl News: सोशल मीडियावर जिकडे तिकडे आलिया आणि रणबीरच्या नावाचं कौतूक सुरु आहे. बॉलीवूड कमालीचं आनंदून गेलं आहे. पहिली बेटी धनाची पेटी रणबीरचं अशा शब्दांत कौतूक करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आलिया रणबीरच्या गोड बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलियानं आपण प्रेग्नंट असल्याचे सांगून चाहत्यांना धक्का दिला होता.

आलिया आता एका मुलीची आई झाली आहे. सकाळपासून साऱ्या बॉलीवूडचे लक्ष आलियाकडे लागले होते. त्यामुळे तिची गोड बातमी व्हायरल झाल्यापासून त्या दोन्ही सेलिब्रेटींवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. नुकत्याच दोन महिन्यांपूर्वी आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाला होता. त्याला बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुन आलिया आणि रणबीरला ट्रोल देखील करण्यात आले होते.

सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय तर करण जोहर हा ट्रोल होतो आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळया प्रतिक्रिया देत, पोस्ट शेयर करुन त्याला ट्रोल केले गेले आहे. यामुळे अनेकांना एक प्रश्न पडला आहे की, करण जोहर का ट्रोल होतोय....त्याचा फोटो दाखवून पाळण्यातील आलियाच्या बाळाचा फोटो दाखवत तू मोठेपणी अभिनेत्री होणार असे वाक्य करण जोहरच्या तोंडी घालण्यात आले आहे, सोशल मीडियावर करण जोहरचे वेगवेगळे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आलियाची गोड बातमी ऐकल्यानंतर करणनं तातडीनं रुग्णालयात धाव घेतली असून तो आलियाच्या मुलीली स्टुडंट ऑफ द इयरच्या आठव्या पार्टसाठी साईन करणार असल्याच्या मीम्सही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन अनेकांनी करणला ट्रोल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT