Amir Khan
Amir Khan  esakal
मनोरंजन

Amir Khan : उत्तरप्रदेशात आहे आमिर खानची आंब्याची बाग, सलमानपासून या स्टार्सनी चाखलीय आंब्यांची चव

सकाळ डिजिटल टीम

Amir Khan : उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यात शहाबाद शहर आंब्याचा पट्टा म्हणून ओळखला जातो. शिवाय याच पट्ट्यात चित्रपट स्टार आमिर खानच्या आंब्याच्या बागा देखील आहेत. कारण आमिरचे वडिलोपार्जित घर शहाबादमध्येच आहे. त्याचे पूर्वज अख्तरपूर गावचे रहिवासी होते. आमिर खानचे नातेवाईक अजूनही अख्त्यारपूर गावात राहतायत. या गावात आमिर खानची आंब्याची मोठी बाग आहे.

किंबहुना इथले आंबे जेवढे खायला रुचकर आहेत, त्याहीपेक्षा त्याचे सौंदर्य मनाला मंत्रमुग्ध करणारे आहे. या बागेत पिकवलेले आंबे आग्रा, नवाबांचे शहर लखनौ आणि मायानगरी मुंबईला पुरवले जातात. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शहाबादी आंब्याची झाडं राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवत दिमाखात उभी आहेत.

आंब्याच्या सर्वोत्तम जाती

शहाबादमधील आंब्यांच्या बागांवर गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. किंबहुना येथील लोकांनी आंब्याच्या रोपावर अनोखी कारागिरी करून आंब्याच्या उत्तम जाती आणि पोटजाती तयार केल्या आहेत. या आंब्याच्या चवीची आणि सौंदर्याची परदेशातही चर्चा आहे.

आंब्याच्या बागेचे मालक बब्बू खान सांगतात की, त्यांच्या बागांमध्ये हुस्न आरा, गुलाब खास, खासुलखास, अल्फांजू, चुंबक सीसी, गुलाब जामुन, आबे हयात, भोगमियान, अंगूरी, शरबती, राम केला आणि राजा गुलाब यासह अनेक प्रकारच्या आंब्यांची लागवड केली जाते. विशेष म्हणजे आंब्याची ही जात ज्येष्ठांनी वेळोवेळी संशोधन करून तयार केली आहे.

तसे, मलिहाबाद हे उत्तरप्रदेशातील आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. पण शहाबाद हे आंब्याच्या उत्तम जातीसाठी ओळखले जाते. येथील बहुतांश आंब्याला मायानगरी मुंबईतील स्टार्सकडून मागणी असते. दिलीप कुमारपासून सलमान खानपर्यंत शाहरुख खान आणि आमिर खान यांनी येथील आंब्याची चव चाखली आहे.

आमिर खानची वडिलोपार्जित आंब्याची बाग

शहाबादमधील अख्त्यारपूर गावात आमिर खानची मोठी बाग आहे. आमिरचे नातेवाईक नईम खान सांगतात की, शाहाबादमध्ये 100 हून अधिक प्रकारचे आंबे मिळतात. येथील विशेष आंब्याचे रोप माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांनी ऑर्डर केले होते आणि ते राष्ट्रपती भवनाच्या अशोका गार्डनमध्ये लावले होते.

अख्तरपूरचे रहिवासी मौलवी अन्वर हुसेन यांनी या आंब्याच्या रोपांची जात विकसित केली. दुसरीकडे शहााबादला आंब्याचा हरित पट्टा घोषित करण्यात आला आहे. येथील तरुण आता आंब्यासाठी हायटेक रोपवाटिका तयार करत आहेत. या रोपवाटिकेसाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT