big b remo 
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांनी रेमो डिसुजासाठी केलं खास ट्वीट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूजाला ११ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रेमोला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी रेमोच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. यातंच बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी देखील रेमोसाठी खास ट्विट केलं आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एका चाहत्याने शेअर केलेला व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ रिट्विट करत त्यांनी कॅप्शन देखील दिलं आहे.  ‘रेमो लवकर बरा हो, तू लवकर बरा व्हावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वांनी रेमोसाठी प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’ असं त्यांनी म्हटलं आहे. एका यूजरने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ  रिऍलिटी शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून रेमो त्यांची स्तुती करतोय असं दिसून येतंय.

रेमो हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचे चाहते काळजीत होते मात्र रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने रेमोच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ‘रेमोच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून तो सध्या ठिक आहे’.  रेमोने ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या अनेक रिऍलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम केलंय. तसंच ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी यांसारख्या काही मोजक्या सिनेमांचं दिग्दर्शन देखील केलं आहे. मात्र रेमोला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘डान्स इंडिया डान्स’ या रिऍलिटी शोमधून.

amitabh bachchan wishes remo dsouza a speedy recovery 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : थेऊरमध्ये 50 घरांत शिरलं पाणी, घटनास्थळी एनडीआरएफ पथक दाखल

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT