Anushka Sharma pens angry post as brand features her in campaign without permission Google
मनोरंजन

Anushka Sharma: प्रसिद्ध ब्रान्ड विरोधात अनुष्का शर्माची पोस्ट, भडकलेल्या अभिनेत्रीनं दिला धमकीवजा इशारा..

अनुष्का शर्माच्या परवानगीविना तिचे फोटो एका बड्या ब्रान्डनं वापरल्यानं वाद पेटला आणि आता अभिनेत्रीच्या चाहत्यांनीही वादात उडी घेतल्याचं चित्र दिसत आहे.

प्रणाली मोरे

Anushka Sharma: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भडकलीय ही बातमी काही क्षणात वाऱ्यासारखी पसलरी अन् जो-तो चर्चा करू लागला. नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये दिसणारी अनुष्का खूप बिनधास्त आणि रोखठोक आहे. पण तिला असं भडकताना खूप कमी पहायला मिळालं आहे. आता एका ब्रान्डनं अशी काही हरकत केलीय ज्यानं अभिनेत्रीचा पारा चढला. आणि अनुष्कानं यासाठी ब्रान्डला तिखट भाषेत सुनावलं आहे.(Anushka Sharma pens angry post as brand features her in campaign without permission)

झालं असं की प्रसिद्ध ब्रान्ड पूमाने अनुष्का शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीनं पूमाचे टॉप, को-ऑर्ड सेट आणि जॅकेट घातलं आहे. या फोटोंना शेअर करत या ब्रान्डने सेलिब्रिटी देखील कसे आपला ब्रान्ड वापरतात यासंदर्भात नेटकऱ्यांशी भाष्य केले. पण आपल्या फोटोंना कंपनीनं प्रमोशन साठी वापरणं अनुष्का शर्माला मुळीच आवडलं नाही. कारण यासाठी तिची परवानगी घेण्यात आली नव्हती.

अनुष्काच ती..डोकं फिरल्यावर लागलीच तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीत पूमा कंपनीची ती प्रमोशनवाली पोस्ट शेअर करत लिहिलं की,'' हॅलो पूमा इंडिया. मला वाटतं की तुम्हाला कदाचित ही गोष्ट चांगलीच माहित असेल की माझ्या परवानगी शिवाय तुम्ही माझे फोटो तुमच्या प्रमोशनसाठी वापरू नाही शकत. कारण मी तुमची ब्रान्ड एम्बेसेडर नाही. कृपया आधी ते फोटो तिथून काढून टाका''.

अनुष्काच्या या पोस्टला पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी पूमा ब्रान्डला ट्रोल करायला सुरुवात केली. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की,अनुष्कानं मस्त केलं जे ब्रान्डला टोकलं. तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की,ब्रान्डला हे करण्याआधी अनु्ष्काची परवानगी घ्यायला हवी होती,तर काहींचे म्हणणे पडले की कंपनीनं ती पोस्ट लागलीच डिलीट करायला हवी.

Anushka Sharma Pens Angry post against Puma India

पूमा इंडियाची ब्रान्ड एम्बेसेडर करिना कपूर खान आहे. बोललं जात आहे की, अनुष्का शर्माची पोस्ट ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते कारण अभिनेत्रीचा पती आणि क्रिकेटर विराट कोहलीनं त्या ब्रान्डच्या पोस्टला लाइक केलं आहे. आता पुढे काय होतं हे पाहण्यासारखं आहे. कंपनीनं अद्याप या पोस्टला डीलिट केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT