anushka sharma, Virat Kohli, vamika
anushka sharma, Virat Kohli, vamika file image
मनोरंजन

'वामिका कोणासारखी दिसते?' विराटच्या बहिणीने दिलं उत्तर

स्वाती वेमूल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली Virat Kohli आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा Anushka Sharma या वर्षी आई-बाबा बनले. या वर्षाच्या सुरवातीलाच अनुष्काने मुलीला जन्म दिला. 'विरुष्का'ची मुलगी वामिकाला Vamika पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत. मात्र इतक्यात तरी मुलीचा चेहरा दाखवणार नसल्याचं विराट-अनुष्काने स्पष्ट केलं. वामिकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असणारे चाहते विविध माध्यमांतून तिच्याबद्दल प्रश्न विचारताना दिसतात. नुकतंच, एका चाहत्याने विराट कोहलीच्या बहिणीला वामिकाबद्दल प्रश्न विचारला. विराटची बहीण भावना कोहली धिंग्रा इन्स्टाग्रामवर 'Ask Me Anything' (आस्क मी एनिथिंग) या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधत होती. यावेळी एकाने तिला वामिका कोणसारखी दिसते, असा प्रश्न विचारला. (Anushka Sharma Virat Kohlis fans ask his sister who Vamika looks like)

'तू वामिकाला भेटलीस का' ती कोणासारखी दिसते, अनुष्का की विराट,' असा प्रश्न विचारला असता त्यावर भावनाने वामिकाबद्दल फारशी माहिती दिली नाही. 'होय, मी तिला भेटले. ती परी आहे', असं तिने उत्तर आहे. आणखी एका चाहत्याने तिचं अनुष्कासोबत पटतं का, असा प्रश्न विचारला. 'ती खूप चांगली आहे, माझं तिच्यावर फार प्रेम आहे', असं भावना म्हणाली.

वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही, आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तिला समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं विराटने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. एका चाहत्याने विराटला मुलीचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विचारला होता.

विराट आणि अनुष्का यांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. विराटच नव्हे तर अनुष्कानेही आपल्या मुलीचा चेहरा न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी खासगी आयुष्यात माध्यमांनी ढवळाढवळ करू नये, असे आवाहनही केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT