Arjun Kapoor Malaika Arora
Arjun Kapoor Malaika Arora Instagram
मनोरंजन

Malaika Arora | 'तू हसत रहा'; मलायकासाठी अर्जुनची रोमँटिक पोस्ट

स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Malaika Arora तिचा ४८ वा वाढदिवस आज (शनिवार) साजरा करत आहे. तिच्या या खास दिनानिमित्त प्रियकर अर्जुन कपूरने Arjun Kapoor सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. मलायकासोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत अर्जुनने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका आणि अर्जुन ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला दोघांनीही रिलेशनशिपबद्दल बोलणं टाळलं होतं. मात्र आता सोशल मीडिया आणि माध्यमांसमोर मलायका आणि अर्जुन मोकळेपणाने प्रेमाची कबुली देताना दिसतात. (Malaika Arora Birthday)

अर्जुनने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये मलायका त्याला किस करताना दिसतेय. 'आजच्या खास दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी माझी एकच इच्छा आहे, ते म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणणं. या वर्षी तू सर्वांत जास्त हसत राहावंस,' अशा शब्दांत अर्जुनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अर्जुनच्या या फोटोवर मलायकानेही कमेंट केली आहे. 'या फोटोमध्ये मी तुला हसवतेय, हे स्पष्ट दिसतंय', असं तिने म्हटलंय. डिनर पार्टीमधला हा फोटो असून त्यावर करीना कपूर, दिया मिर्झा, अमृता अरोरा, मनिष मल्होत्रा, बिपाशा बासू, ताहिरा कश्यप यांसह इतरही काही सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. 'अर्जुनजी, मला फोटो क्रेडिट हवा आहे', अशी कमेंट करीनाने या फोटोवर केली आहे. अवघ्या तासाभरात या पोस्टला लाखो लाइक्स मिळाले आहेत.

२०१९ मध्ये अर्जुनच्या ३४व्या वाढदिवशी मलायकाने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. मलायकाने २०१७ मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. १९ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मलायका आणि अरबाज यांना १८ वर्षांचा अरहान हा मुलगा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT