मनोरंजन

कलाशिक्षणाला फिल्ममेकिंगची जोड

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - शहर आणि जिल्ह्यात अभिजात कलेचे शिक्षण देणारी सहा महाविद्यालये असून, बदलत्या जगाला सामोरे जाताना आता कलाशिक्षणाला फिल्ममेकिंगची जोड मिळाली आहे. शिक्षण घेत असतानाच शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून तरुणाई या क्षेत्रात दमदार एंट्री करू लागली आहे. दरम्यान, दुसरीकडे स्पेशल इफेक्‍टस्‌साठी बॉलीवूडच्या सिनेमांची कोल्हापूरला मागणी वाढली आहे.   

अभिजात कलाशिक्षण...        
कलापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांत राज्यभरातून विद्यार्थ्यांचा ओघ असतो. जिल्ह्यात एकूण सहा कला महाविद्यालये असून, त्यांत शहरातील दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूट, रा. शि. गोसावी कलानिकेतन, कलामंदिर महाविद्यालयासह इचलकरंजीचे ललित कला, गडहिंग्लजचे साधना आणि शिनोळीचे भंडारी स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयांचा समावेश आहे. 

कला शिक्षणातील कोणत्याही अभ्यासक्रमासाठी एक वर्षाचा ‘फाउंडेशन’ अभ्यासक्रम सक्तीचा असतो. त्यानंतर गुणवत्तेनुसार पेंटिंग, शिल्पकला, कमर्शियल अशा विविध अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. कला शिक्षणासाठी प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शिक्षण घेत असतानाच फोटोग्राफी, डॉक्‍युमेंटरी, व्हिडिओ एडिटिंग, वॉल पेंटिंग, ग्राफिक डिझायनिंग अशी विविध कामे करून, स्वतःच्या शिक्षणाचा खर्च करतात. शिक्षणानंतर या विद्यार्थ्यांना कोल्हापुरात फारशा संधी उपलब्ध नसल्या, तरी कलादिग्दर्शनात त्यांनी करिअर यशस्वी केले आहे. संजय लीला भन्साळी, नितीन चंद्रकांत देसाई अशा दिग्गजांच्या टीममध्ये येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

फिल्मफेअर ॲवार्ड
गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म (इफ्फी) फेस्टिव्हलमध्ये सलग तीन वर्षे कोल्हापूरच्या दिग्दर्शकाने तयार केलेला लघुपट दाखवला गेला. ‘चौकट’, ‘बलुतं’नंतर यंदा मेधप्रणव सरस्वती बाबासाहेब यांच्या ‘हॅप्पी बर्थ डे’ या लघुपटाची इंडियन पॅनोरमा विभागात निवड झाली. उमेश बगाडेंच्या ‘अनाहूत’नं पहिल्यांदाच कोल्हापुरात फिल्मफेअर ॲवार्ड आणलं. ‘चौकट’ आणि ‘सावट’ या लघुपटांची कान्स शॉर्टफिल्म कॉर्नरसाठी निवड झाली.

दृष्टिक्षेपात संधी

  • कला महाविद्यालये ः ६
  • एंटरटेनमेंट स्किल्स देणाऱ्या संस्था ः ४०
  • वर्षाला प्रशिक्षित विद्यार्थी संख्या ः सुमारे १२००

मोठे बॅनर येऊ लागले...
बॉलीवूडचे चित्रपट व मोठ्या बॅनर्सना स्पेशल इफेक्‍टस्‌साठी थेट येथील स्टुडिओत आणले गेले. ‘भाग मिल्खा भाग’, ‘एक था टायगर’, ‘सुलतान’, ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ असो किंवा ‘दुनियादारी’पासूनच्या बिगबजेट मराठी चित्रपटांचा त्यात समावेश आहे. अष्टविनायक मीडिया अँड एंटरटेन्मेंट या संस्थेचे मनोरंजन विश्‍वातील देशभरातील नामांकित कंपन्यांबरोबर करार झाले आहेत. एडिटिंग, व्हिज्युअल इफेक्‍टस्‌, ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन, ब्रॅंडिंग आणि प्रशिक्षण या सर्व सेवा एकाच छताखाली येथे उपलब्ध असून, स्थानिक शंभरहून अधिक तरुणांना येथे रोजगार मिळाला आहे. त्याशिवाय ‘अष्टविनायक’सह येथील चाळीसहून अधिक संस्थांत विविध अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध कॉर्पोरेट कंपन्यांत मागणी वाढली आहे. 
(क्रमशः)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT