salil sandip
salil sandip 
मनोरंजन

शब्द-सुरांचं नातं जमलं कसं?

शब्दांकन :काजल डांगे

जोडी पडद्यावरची 
सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे 

प्रसिद्ध संगीतकार सलिल कुलकर्णी आणि सगळ्यांचाच लाडका कवी संदीप खरे यांची घट्ट मैत्री साऱ्यांनाच ठाऊक आहे. कलाक्षेत्रात सलिल-संदीपसारखी निखळ मैत्री फार कमी पाहायला मिळते. या दोघांनी आतापर्यंत "आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाचे दीड हजाराहून अधिक प्रयोग केले आहेत.

या दोघांची पहिली भेट झाली ती एका कार्यक्रमादरम्यान. याच भेटीबाबत संदीप म्हणतो, "एक नवीन मराठी चॅनल आलं होतं. त्या चॅनेलच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पुण्यात होता. तिथं मी आणि सलिल दोघंही होतो आणि तिथं आमची भेट झाली. याआधी आम्ही एकमेकांच्या गाण्यांच्या कॅसेट्‌स ऐकल्या होत्या. त्यामुळे मला सलिलचं आणि सलिलला माझं काम माहीत होतं. सलिल बेलासाठी एक अल्बम करत होता. तेव्हा त्या अल्बमसाठी मी एक गाणं लिहिलं. त्यानंतर आम्ही काही शोज केले.

"आयुष्यावर बोलू काही'ची आम्ही पहिली कॅसेट केली आणि नंतरच त्याचे लाइव्ह शो करायला सुरवात केली.' एका कार्यक्रमादरम्यान योगायोगानं भेट घडली आणि त्यामधूनच अनोख्या मैत्रीच्या प्रवासाला सुरवात झाली. 
प्रत्येकाला हेवा वाटावा अशीच सलिल-संदीपची मैत्री आहे. दोघांच्या बऱ्याच आवडी-निवडी सारख्या आहेत. त्यामुळे दोघांमध्ये ट्युनिंग फार चांगलं आहे. खूप चांगलं ट्युनिंग असल्यास जास्त बोलायची गरज भासत नाही, असे संदीप म्हणतो, तर सलिलाही संदीपचं तेवढंच कौतुक आहे. "फडके, माडगूळकर यांच्या काळाशी नात सांगणारं संदीपचं व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्या हातात सतत पुस्तक दिसतं. विशेष म्हणजे, त्याला निसर्गात रमायला खूप आवडतं. हे संदीपच व्यक्तिमत्त्व त्याला कवी म्हणून समृद्ध बनवतं. गंमत म्हणजे, त्याच्या कविता त्याच्यापेक्षा मला जास्त तोंडपाठ आहेत,' असं सलिल अभिमानानं सांगतो. आपल्या मनात नेमकं काय दडलंय हे संदीप त्याच्या कवितेतून बोलून जातो, तर सलिलची गाणी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावतात.

सलिल सांगतो, "आमच्या मैत्रीला मिळालेली सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे आमची गाणी आहेत. एखादी ज्येष्ठ व्यक्ती येऊन "तुमच्या मैत्रीला कोणाची नजर न लागो,' असं म्हणते तेव्हा खूप समाधान वाटतं. संदीपचं आणि माझं एक विशेष आहे. "आयुष्यावर बोलू काही'चे पंधराशेहून अधिक प्रयोग झाले. आमचं इतकं कौतुक, स्तुती झाली. पण या सगळ्यात आम्ही भारावून जात नाही. "आपलं आज किती कौतुक झालं ना,' असं आजवर आम्ही एकमेकांना कधीच बोललो नाही. आज प्रत्येकाला सलिल-संदीपची मैत्री कायम टिकून राहावी असं वाटतं, हेच रसिक प्रेक्षकांच प्रेम दोघांनाही नव्यानं काम करायचं बळ देतं. शिवाय "वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या निमित्तानं सलिल दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतो आहे. या चित्रपटाची कथा सलिलनंच लिहिली आहे. त्याच्या या नव्या प्रवासातही संदीपनं त्याची साथ दिली आहे. या चित्रपटाची सगळी गाणी संदीपनं लिहिली आहेत. सलिलच्या नव्या वाटचालीतही तो आनंदानं सहभागी झाला आहे.

संदीप म्हणतो, "सलिलचा हा पहिलाच चित्रपट आणि तोही कॉमेडी. त्यामुळं चित्रपटातील गाणीही कॉमेडी आणि मिस्कील आहेत. कथा चांगली असल्यानं गाणी करताना फार मजा आली.' आपल्या प्रत्येक प्रोजेक्‍टमध्ये जवळच्या माणसांची साथ हवी असं सलिलला वाटतं आणि संदीपही "वेडिंगचा शिनेमा'शी जोडला गेल्यानं त्याचा आनंद द्विगुणित झाला. "संदीपला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच मला जिंकल्यासारखं वाटलं. कारण संदीपला मी खूप जवळून ओळखतो. त्याला निवडक गोष्टीच आवडतात. त्याला कथा मनापासून आवडली आणि म्हणूनच त्यानं लिहिलेली गाणीही अगदी उत्कृष्ट आहेत,' असं सलिल सांगतो. 

सलिल-संदीपच्या मैत्रीमध्ये पारदर्शकता आहे. त्यांच्यामधील ही पारदर्शकताच त्यांच्या मैत्रीचं सर्वांत मोठं बळ आहे. काही न बोलताही खूप काही बोलून जाणं, फार कमी जणांना जमतं. त्यापैकी हे दोघं आहेत. सलिल-संदीपची ही मैत्री यापुढं ही अशीच कायम राहणार आणि या दोघांची जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार, यात शंकाच नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT