Avatar the last airbender latest news
Avatar the last airbender latest news Esakal
मनोरंजन

Avatar The Last Airbender Trailer : 'आंग' एवढा पराक्रम कसा करु शकतो, 'अवतार द लास्ट एयरबेंडर' कुठं रिलीज होणार?

युगंधर ताजणे

Avatar the last airbender trailer : मनोरंजन विश्वात सध्या अवतार द लास्ट एयरबेंडर नावाच्या सीरिजनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या नव्या सीझनची चर्चा रंगली होती. आता या (Avatar the last airbender trailer news) मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी अवतार द लास्ट एयरबेंडरच्या सीरिजनं चाहत्यांची मोठ्या प्रमाणात (Avatar the last airbender trailer netflix) पसंती मिळवली होती. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यानंतर चाहत्यांना वेध लागले होते ते दुसऱ्या सीझनचे. आता ही मालिका २२ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही मालिका आंग नावाच्या मुलावर आधारित आहे. तो एक अवतारित मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या अचाट पराक्रमांनी चाहत्यांना थक्क करुन सोडले आहे. जगातील जो अनिष्ट प्रभाव आहे त्याला दूर करण्यासाठी आंगची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यासाठी तो सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. त्यानं अग्नी, जल, वायू, पृथ्वी या तत्वांवर त्यानं हुकूमत गाजवली आहे.

आंग हा कमालीचा प्रभावी आहे. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्याच्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी आहे याचे त्याला भान आहे. त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात ते जाणवते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेलरमध्ये आंग काय आहे अन् तो काय करु शकतो याचा अंदाज आपल्याला येतो. त्याच्या या अचाट पराक्रमाचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. गेल्या सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

अॅक्शन, थ्रिलर अशा अवतार द लास्ट एयरबेंडरचे चाहत्यांना गेल्या काही दिवसांपासून वेध लागले होते. त्यांची प्रतिक्षा आता संपली असून नेटफ्लिक्सवर या मालिकेचा आनंद चाहते घेऊ शकतात. ओटीटीवर सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमध्ये आंगच्या या मालिकेचा समावेश होतो. गॉर्डन कॉर्मियरनं आंगची भूमिका साकारली असून त्याच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

याशिवाय किओवेंटियो वॉटरबेंडरनं कटाराची, कटाराचा भाऊ सोक्का म्हणून इयान ओस्ले, फायरबेडिंग रॉयल्टी, जुकोच्या भूमिकेतील डलास लियु यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या खास आवडीच्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT