avdhoot gupte make special song on dr babasaheb Ambedkar Jayanti shared video sung by santosh jondhale
avdhoot gupte make special song on dr babasaheb Ambedkar Jayanti shared video sung by santosh jondhale sakal
मनोरंजन

Ambedkar Jayanti: अवधूतनं बाबासाहेबांसाठी केलं खास गाणं.. व्हिडिओ शेयर करत म्हणाला..

नीलेश अडसूळ

Avdhoot Gupte: जय जय महाराष्ट्र माझा म्हणत पारंपरिक संगीत आणि फ्यूजन यांचं उत्तम समीकरण साधारणा गायक म्हणजे अवधूत गुप्ते. केवळ गायकच नाही तर संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि एक उत्तम चौकस कलाकार म्हणून अवधूत गुप्तेकडे पाहिले जाते.

अवधूतचं गाणं आलं आणि आपण नाचलो नाही असं क्वचितच होतं. नुकतच त्याने मनसे पक्षाचं नवं गाणं गायलं आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. आज त्याने पुन्हा एकदा चाहत्यांना एक भन्नाट भेट दिली आहे.

आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अवधूत ने एक खास गाणं शेयर केलं आहे. सोबत एक पोस्ट देखील लिहिली आहे. अवधूतचं हे नवं गाणं चांगलंच गाजतय..

(avdhoot gupte make special song on dr babasaheb Ambedkar Jayanti shared video sung by santosh jondhale)

अवधूतने आज बाबासाहेबांच्या नावाचा गजर आपल्या गाण्यातून केला आहे. 'गाऊ.. बुद्धम शरणम..' असे या गाण्याचे बोल असून प्रत्येकाला नाचायला भाग पाडणारे हे गाणे आहे. हे गाणे संतोष जोंधळे या गायकाने गायले असून अवधूतच्या एकवीरा प्रोडक्शनने त्याची निर्मिती केली आहे.

या गाण्याचा दमदार व्हिडिओ शेयर करत अवधूतने लिहिले आहे की, 'परमपूज्य बोधीसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! यंदा खास संतोष जोंधळे च्या आवाजात रेकॉर्ड केलेलं हे भीमगीत लोकार्पित झाल्यानंतर आता तुमचं बोट धरून हळूहळू रांगू लागलं आहे.. मोठं होत आहे. ह्या गाण्याला तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल एकविरा प्रॉडक्शनच्या संपूर्ण चमू तर्फे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो! जय भीम!! जय शिवराय!! जय हिंद!! जय महाराष्ट्र!!'' अशा शब्दात त्याने आपल्या भवाना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT