Baaghi 3 movie poster released today  
मनोरंजन

Baaghi 3 Poster : रणभूमीवरील पिळदार शरिरयष्टीतला टायगर बघाच!

वृत्तसंस्था

टायगर श्रॉफच्या बहुचर्चित 'बागी 3'चा पोस्टर आज (ता. 3) रिलीज झाला. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी हा पोस्टर शेअर करत ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे. पोस्टर शेअर केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर हे पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे. तर 6 फेब्रुवारीला या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित होईल.

युद्धाच्या मैदानात, पिळदार शरिरयष्टी असलेला टायग उभा आहे. या पोस्टरला 'सगळ्यात ताकदवान शत्रूच्या विरोधात एका देशाविरूद्ध सगळ्यात मोठी लढाई, रॉनी परत आलाय...' असं कॅप्शन दिलं आहे. यावरून हे सिद्ध होतंय की टायगरच्या कॅरॅक्टरचं नाव रॉनी आहे आणि सर्वात मोठ्या अशा लढाईसाठी तयार आहे. या पोस्टरमध्ये दिसतंय की टायगरच्या समोर मोठमोठ्या तोफा, रनगाडे आणि फायटर प्लेन आहेत. या सगळ्यांच्या समोर छाती मोठी करून निडरपणे टायगर उभा आहे. 

टायगरसोबतच या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. एका एअर हॉस्टेसच्या भूमिकेत ती असल्याच्या चर्चा आहेत. बागीच्या पहिल्या पार्टमध्येही ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. याशिवाय रितेश देशमुख, विजय वर्मा, अंकिता लोखंडे, दिशा पटानी आणि खुद्द जॅकी श्रॉफ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. तर अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानचा अनैतिकपणा! हल्ला विध्वंसक, 3 क्रिकेटर्सच्या मृत्यूवर राशिद खानने व्यक्त केलं दु:ख; क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेचं स्वागत

Kolhapur Politics : ‘हत्ती’, ऊसदर व्हाया जिल्हा परिषद आरक्षण, ‘गोकुळ’मध्ये नेत्यांची खुमासदार चर्चा; वसुबारस कार्यक्रमावेळी राजकीय टोलेबाजी

Diwali 2025 Lakshmi Puja Guide: लक्ष्मीपूजन करताना 'हे' नियम ठेवा लक्षात, लाभेल सुख-समृद्धी

क्रिकेटमध्ये नवा नियम! आता फलंदाज नाही खेळू शकणार 'हा' शॉट, गोलंदाजांना होणार फायदा...

Video : पूर्णा आजीने एंट्री केल्या केल्या प्रियाला थोबडवलं ! प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खुश "ज्जे बात..!"

SCROLL FOR NEXT