Baipan Bhari Deva esakal
मनोरंजन

Baipan Bhari Deva : 5 कोटींचे बजेट, कमाई 50 कोटींची! सगळीकडं हाऊसफुल्ल...

सध्या केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवाची मोठी चर्चा आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे.

सकाळ डिजिटल टीम

Baipan Bhari Deva Box Office 50 Core Collection : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका चित्रपटानं मोठी कामगिरी केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची मोठी चर्चा सुरु झाली आहे.

एकीकडे बॉलीवूच्या चित्रपटांकडे वाढणारा प्रेक्षकांचा ओघ, आणि त्यातून हिंदी चित्रपटांची होणारी कमाई टॉलीवूडच्या चित्रपटांच्या दृष्टीनं मोठी असली तरी यासगळ्यात मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. केदार शिंदे यांच्या यापूर्वीच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. खरं तर कोरोनाच्या काळातच बाई पण भारी देवाचे चित्रिकरण पूर्ण झाले होते. मात्र या चित्रपटाला कोरोनाचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर शिंदे यांनी आता हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांतील थिएटरमध्ये महिलांचा बाईपण भारी देवाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. थिएटरमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. केवळ पाच कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं आतापर्यत पन्नास कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये बाईपण भारी देवाचे नाव पहिल्या तीनमध्ये आहे. यावरुन या चित्रपटाची लोकप्रियता आणि त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात येईल.

केवळ शहरचं नाहीत तर ग्रामीण भागात देखील महिलावर्गाचा या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. महिलांनी दिग्दर्शक केदार शिंदे आणि बाईपण भारी देवाच्या संपूर्ण टीमचे तोंडभरून कौतूक केले आहे. बऱ्याच दिवसांनी एक उत्तम मराठी कलाकृती पाहिल्याची भावना महिलांनी व्यक्त केली आहे. बाईपण भारी देवानं पहिल्या आठवड्यामध्ये साडेबारा कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट १३ कोटींची कमाई करताना दिसतो आहे.

केदार शिंदेंच्या या चित्रपटामध्ये, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जिओ स्टूडिओ आणि माधुरी भोसले यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT