मनोरंजन

बिचुकलेचं देवोलिनाला किससाठी ब्लॅकमेलिंग, ती म्हणाली तू...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसची ओळख आहे. आतापर्यत या मालिकेनं लोकप्रियतेची शिखरं गाठली आहेत. वादग्रस्तेमुळे बिग बॉसनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यंदाचा बिग बॉसचा सीझन अर्ध्यावरच बंद होणार असल्याची चर्चा होती. त्याचे कारण त्याचा घसरलेला टीआरपी. यानंतर निर्मात्यांनी चिंता व्यक्त केली होती. यावेळी मेकर्सनं पुन्हा काही स्पर्धकांना वाईल्ड कार्डव्दारे इंट्री दिली. त्यामुळे बिग बॉसच्या टीआपीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

नव्यानं जे स्पर्धक आले आहेत त्यामध्ये राखी सावंत, तिचा पती रितेश, अभिजित यांचा समावेश आहे. यांच्याव्यतिरिक्त आणखी काही स्पर्धक सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांची जोरदार भांडणं झाली होती. त्यामध्ये अभिजितनं राखीच्या पतीविषयी अपशब्द वापरले होते. दरम्यान रितेशची पोलखोल त्याच्या खऱ्या पत्नीनं केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो आपल्याला पट्ट्यानं मारहाण करत असल्याचा आरोप रितेशच्या पत्नीनं केला होता. आता अभिजित बिचुकले (BB15 Abhijeet Bichukale Wants To Kiss Devoleena Bhattacharjee) वादात सापडला आहे. त्यानं जे केलं त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर रंगली आहे.

अभिजित बिचुकलेनं (Abhijeet Bichukale) आपल्याला देवोलिनाला (Devoleena Bhattacharjee) किस करण्याची इच्छा आहे. असं तिलाच बोलून दाखवलं. त्यानंतर देवोलिना रागाला गेली. आणि तिनं बिग बॉसला या गोष्टीची कल्पना दिली आहे. सध्या त्याच्या प्रोमोचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या दोघांमध्ये यावरुन जोरदार भांड़णं देखील झाली आहे. त्यामुळे बिग बॉसचं घर वादात सापडलं आहे. बिग बॉसनं सहभागी स्पर्धकांना एक टास्क दिला होता. त्यामध्ये त्यांना म्युझियममधून काही गोष्टींची चोरी करायची असते. अशावेळी अभिजितनं देवोलिना भट्टाचार्याच्या गालाला हात लावून तिचा किस घेण्याची इच्छा व्यक्त केली. असं त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अभिजित तु तुझ्या लायकीत राहा. असं तिनं त्याला सुनावलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT