Umesh kamat : गेल्या काही दिवसात राजकीय नेतृत्वांकडून सामान्य कलाकारांची मुस्कटदाबी होत असल्याचे समोर आले आहे. मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा असो किंवा एकूणच वर्चस्ववादी भूमिका. आता तर या भूमिकांचा नाटकाच्या सादरीकरणालाही धक्का लागू लागला आहे. राजकीय सभामुळे नाटकाचे प्रयोग रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आता अप्रत्यक्ष भाष्य करणारी एक पोस्ट अभिनेता उमेश कामत (umesh kamat) यानेही शेअर केली आहे. राजकीय सभेमुळे त्याला त्याचा पूर्वनियोजीत प्रयोग रद्द करावा लागला आहे.
(because of political reason umesh kamat's 'dada ek good news ahe' drama show cancelled)
मराठमोळा अभिनेता उमेश कामत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. उमेश कामत सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय उमेशचं ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक बरच गाजतंय. या नाटकात अभिनेत्री हृता दुरगुळे, आशुतोष गोखले, आरती मोरे हे कलाकार देखील आहेत. या नाटकाचा पुण्यातील 5 जून रोजी ठरलेला प्रयोग रद्द करावा लागला. त्यानंतर प्रेक्षकांना याबाबत माहिती देण्यासाठी त्याने आपल्या instagram अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ‘एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे ५ जूनचा चिंचवड येथील ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा प्रयोग रद्द. प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात येतील.’ असे त्याने म्हंटले आहे.
उमेशने या पोस्टमध्ये कारणही उघड केले आहे. यावर त्याने अधिक भाष्य करणे टाळले असले तरी त्याचा सूर अत्यंत नाराजीचा आहे. कारण नाटकासाठी नाट्यगृहांची निर्मिती केलेली असताना तिथे राजकीय सभा होणे हे दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे ती तारीख रिकामी असती तर गोष्ट वेगळी आहे. त्या तारखेला प्रयोग लागलेला असताना अशा पद्धतीने तो रद्द होणे हे रंगभूमीसाठी अवमानकारक आहे. मध्यंतरी अशाच राजकीय दबावातून ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे लागलेला 'संज्या-छाया' या नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला होता. असे प्रकार आता वाढू लागल्याने रंगकर्मींकडून या प्रकाराचा निषेध केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.