Team India’s Upcoming Cricket Schedule : भारताच्या युवा संघाने इंग्लंड दौरा गाजवला आणि पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत रोखून बरेच विक्रम मोडले. शुभमन गिल, लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर,रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, रिषभ पंत या सर्वांनी या ऐतिहासिक कामगिरीत हातभार लावला. मालिकेलीत सर्व सामने पाचव्या दिवसापर्यंत खेळले गेले आणि त्यामुळेच कसोटी क्रिकेटची खरी मजा अनुभवता आली.