‘बेरीज वजाबाकी’ या चित्रपटातील कलाकार.
‘बेरीज वजाबाकी’ या चित्रपटातील कलाकार. 
मनोरंजन

‘बेरीज वजाबाकी’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी कनेक्‍ट असलेले पालक आणि मुले चार भिंतीच्या आतील संवादात मात्र डिसकनेक्‍ट होत जात असल्याचे वास्तव अलीकडे प्रकर्षाने जाणवते. याबरोबरच शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्यापासून त्यांच्यावर येणाऱ्या मानसिक ताण तणावाची चर्चा आपण ऐकतो. आजच्या काळातील या संवेदनशील विषयावर साध्या, सोप्या भाषेत मनोरंजक पद्धतीने ‘बेरीज वजाबाकी’ हा चित्रपट भाष्य करतो.

राजू भोसलेनिर्मित, दिग्दर्शित ‘बेरीज वजाबाकी’ हा मुक्तशाळा प्रयोगाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांचे भावविश्व वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करतो. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळा, शिक्षकांचा जेवढा वाट आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक वाटा व मुलांना घडवण्यासाठी जबाबदारी पालकांची आहे. यामुळे हा चित्रपट मुलांसह पालक आणि शिक्षक यांनी आवर्जून बघायला हवा.

जंपिंग टोमॅटो मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत इन असोसिएशन विथ पीएमआरवाय प्रॉडक्‍शन निर्मित ‘बेरीज वजाबाकी’ चित्रपटात मोहन जोशी, नंदू माधव, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, गिरीश परदेशी, मिलिंद गवळी, स्मिता शेवाळे, रमेश परदेशी, डॉ. प्रचिती सुरू, गायत्री देशमुख, सारिका देशमुख, अमित वझे, नीता दोंदे, जयेश संघवी, भक्ती चव्हाण अशी कलाकारांची मांदियाळी आहे. 

याशिवाय बालकलाकारांनी आपल्या भूमिकांमधून पडद्यावर धम्माल केली आहे. चित्रपटाला अभिजित नार्वेकर यांनी संगीत दिले असून अंबरीश देशपांडे यांची गीते आहेत. सोनू निगम, आनंदी जोशी, राशी हरमलकर, विश्वजा जाधव, मानस भागवत यांनी पार्श्वगायन केले आहे. बेरीज वजाबाकी हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT