डोंबिवली, ता. 23 - एमआयडीसी रासायनिक कंपनीतील झालेल्या स्फोटात आठ जण मृत्युमुखी पडले असून या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली दिली. तसेच एमआयडीसी मधील अति धोकादायक रासायनिक कंपन्यांनी शहराबाहेर एमआयडीसीची जी मोकळी जागा आहे तेथे स्थलांतरित झाले पाहिजे असे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
डोंबिवली एमआयडीसीतील अमुकदान या रासायनिक कंपनीत स्फोट होऊन आठ जण मृत्यू तर 60 हून अधिक जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अजूनही बचाव कार्य सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे देखील शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री घटनास्थळी भेट देत घटनेचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती दिली. तसेच जखमींचा खर्च शासन करेल आणि त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना देखील नुकसान भरपाई देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
डोंबिवली एमआयडीसी मध्ये दीडशेहून अधिक धोकादायक रासायनिक कारखाने असून या कारखान्यांचा स्थलांतरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. यावर रासायनिक कारखान्यांची कॅटेगरी करून अति धोकादायक अशा कारखान्यांनी शहराच्या बाहेर एमआयडीसीची जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
सदर दुर्घटनेत जे जे दोष आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि या दुर्घटनेमध्ये देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घातले जाणार नाही. चौकशीमध्ये जे काही समोर येईल, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
अमुदान नावाच्या कंपनीमध्ये रिअॅक्टरचा स्फोट झाला असा प्रथमदर्शनी आढळून आलेला आहे. स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता. आजूबाजूच्या पाच ते सहा कंपन्या आणि आजूबाजूचे नागरी वसाहत त्यांच्या देखील काचांना दरवाजांना तडे गेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आठ जणांचा मृत्यू झाला आहे. काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये अडकलेली आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी जे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्यास प्राधान्य दिलेल आहे असे देखील शिंदे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.