झी मराठी Zee Marathi वाहिनीवरील 'अग्गंबाई सूनबाई' Aggabai Sunbai ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेचा हा दुसरा भाग होता. पहिल्या आणि दुसऱ्या मालिकेत मॅडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी Bhakti Ratnaparkhi हिने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. पहिल्या भागाप्रमाणे मालिकेच्या या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. टीआरपी घसरल्याने वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवेदिता सराफ, गिरीश ओक, उमा पेंढारकर, अद्वैत दादरकर, मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
भक्तीची पोस्ट-
'आज अग्गंबाई सूनबाईमध्ये माझा शेवटचा सीन आहे, म्हणजे मॅडीचा. अग्गंबाई सासूबाईपासून हा प्रवास सुरू झाला होता. मी खूप नशिबवान आहे की मला मॅडी हे इतकं गोड पात्र साकारायला मिळालं. तिचा निरागसपणा, तिचा वेडेपणा मला जगायला मिळाला. कशाचाही जास्त विचार न करणारी, सगळ्यांवर भरभरून नि:स्वार्थी प्रेम करणारी, सगळ्यांशी मैत्री करणारी आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारी, आपल्यामधील लहान मूल नेहमी जपून ठेवणारी, इतकी निरागस मॅडी आता मला परत करायला नाही मिळणार, याचं खूप वाईट वाटतंय. मॅडीवर सगळ्यांनी खूप प्रेम केलंय. तुमच्या सर्वांचे त्यासाठी खूप आभार. निवेदिता सराफ ताई, गिरीश ओक सर तुमच्यासोबत मला कधी काम करायला मिळेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं. मोहन जोशी सर तुमचे आशीर्वाद असेच राहुदेत आणि तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला परत मिळू दे. उमा खूप मज्जा आली तुझ्यासोबत काम करून, खूप सुंदर काम केलंस तू. अद्वैत.. खूप कमी सीन्स होते आपले. पण जे काही सीन्स होते, त्यात मज्जा आली खूप. परत भेटू..लवकरच..एका नवीन भूमिकेत', अशा शब्दांत भक्तीने मॅडीच्या भूमिकेला निरोप दिला.
'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम, मॅडी या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. भक्तीने या मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केलं आहे. 'कॉमेडिची बुलेट ट्रेन' या शोमधून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिने 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.