bhojpuri actress amrapali dubey found corona positive make special appeal fans
bhojpuri actress amrapali dubey found corona positive make special appeal fans 
मनोरंजन

बॉलीवूड नंतर भोजपूरीत घुसला कोरोना; अभिनेत्री आम्रपालीला झाली लागण  

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी आरोग्य प्रशासनानं योग्य ती काळजी घेतली आहे. आता लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. सध्या परिस्थिती फारच बेताची असल्यानं सगळीकडे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना झालेल्या सेलिब्रेटींची संख्याही मोठी आहे. अनेकांनी स्वतला क्वॉरनटाईन करुन घेतले आहे. काहीजण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यासगळ्यात जीव गमावाव्या लागलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. अशातच भोजपूरीतील एका अभिनेत्रीला कोरोना झाला आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.

भोजपूरी अभिनेत्री आम्रपाली दूबे असे कोरोना झालेल्या अभिनेत्रीचे नाव आहे. तिनं आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या आम्रपाली घरीच क्वॉरंनटाईन झाली आहे. यापूर्वी कोरोनानं बॉलीवूडमधील कलाकारांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली असताना आता भोजपूरी चित्रपटसृष्टीलाही त्याचा फटका बसला आहे. यामुळे अनेक सेलिब्रेटी क्वॉरंनटाईन झाले आहेत.

आम्रपालीची ओळख म्हणजे ती भोजपूरी सिनेमा क्षेत्रातील एक प्रख्यात अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोअर्स आहे. गेल्या काही वर्षांपासून तिनं आपल्या अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्रपालीनं सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तिनं लिहिलं आहे की, मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, आज सकाळीच मला कोरोना झाल्याचे कळले. त्यावेळी मी काही अंशी घाबरुन गेले होते. मला माझ्या घरच्यांनी दिलासा दिला. आता मी घरीच क्वॉरनटाईन आहे. तुम्ही काळजी करु नका मी बरी आहे. तुम्ही आता माझ्या परिवारासाठी देवाकडे प्रार्थना करा.

आपल्या आवडत्या अभिनेत्रीला कोरोना झाल्याचे कळताच भोजपूरी फॅन्स भलतेच दु;खी झाले आहेत. त्यांनी आम्रपालीला काळजी घेण्यास सांगितले आहे. आम्रपालीनं सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल केली आहे त्यावर फॅन्सनं मोठ्या संख्येनं कमेंट दिल्या आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT