तैमुरचा योगा पाहिलात? करिनाने फोटो केला पोस्ट

taimur ali khan
taimur ali khan

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचा मुलगा तैमुर आणि पती सैफ अली खानचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करते. तैमुर हा सर्वात चर्चेत असणारा स्टार किड आहे. करिनाने महिला दिनानिमित्त तिच्या दुसऱ्या बाळाचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकताच करिनाने तैमुरचा एक हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करिनाने शेअर केलेल्या तैमुरच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या फोटोमध्ये तैमुर स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. करिनाने या फोटोला कॅप्शन दिले, 'योगानंतरचे स्ट्रेचिंग की झोपेनंतरचे स्ट्रेचिंग?’ या फोटमध्ये तैमुर योगा मॅटवर स्ट्रेचिंग करत आहे. करिनाच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करून या फोटोला पसंती दिली आहे. या फोटोमधून तैमूरचा क्युटनेस नेटकऱ्यांना पहायला मिळत आहे. तसेच अनेक सेलिब्रेटींने देखील या फोटोला कमेंट केली आहे. अभिनेत्री आणि तैमुरची आत्या सोहा अली खानने या फोटोला कमेंट केली, ‘खूप प्रेम. सुरक्षित रहा. ’

होळीच्या दिवशी करिनाने तैमुरचा रंग खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच तैमुरचा कुकिज बेक करतानाचा फोटो देखील करिनाने पोस्ट केला होता. 16 ऑक्टोबर 2012 रोजी सैफ आणि करिनाचे लग्न झाले. त्यानंतर 20 डिसेंबर 2016 रोजी तैमुरचा जन्म झाला. तैमुर लहान असल्यापासूनच चर्चेत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com