Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi  
मनोरंजन

'बिग बॉस मराठी ३'च्या विजेत्याला मिळणार इतके लाख रुपये

स्वाती वेमूल

(Bigg Boss Marathi 3) बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आता बिग बॉसच्या घरात फक्त सात स्पर्धक राहिले असून लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदाच्या सिझनमधील स्पर्धकांमध्ये अटीतटीची चुरस पहायला मिळतेय, त्यामुळे विजेता कोण ठरणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. नुकत्याच पार पडलेल्या चावडीच्या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम किती असेल याबद्दल सांगितलं. ही रक्कम यंदाच्या सिझनमध्ये वाढवण्यात आली आहे.

मांजरेकर यांनी आधी घरातील स्पर्धकांना विचारलं की, त्यांना विजेत्या स्पर्धकाची बक्षीस रक्कम माहित आहे की नाही? त्यावर सर्वांनी नकारार्थी उत्तर दिलं. यानंतर त्यांनी सांगितलं की शोची बक्षीस रक्कम २५ लाख रुपये आहे. ही रक्कम ऐकून घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. "आपला शो मोठा असल्याने बक्षिसाची रक्कमसुद्धा मोठी आहे", असं मांजरेकर म्हणाले. बक्षिसाच्या रकमेशिवाय विजेत्याला मिळणाऱ्या इतर कोणत्याही भेटवस्तूंचा खुलासा अद्याप करण्यात आला नाही.

बक्षिसाची रक्कम सांगितल्यानंतर महेश मांजरेकर यांनी अभिनेता सिद्धार्थ जाधवला मंचावर बोलावलं आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली. घरातील सर्व स्पर्धकांनी महेश मांजरेकर यांना शो होस्ट करण्याची विनंती केली. आता महेश मांजरेकर या शोचं सूत्रसंचालन पुढे करणार की त्यांच्या जागी सिद्धार्थ जाधव होस्ट करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये बक्षिसाची रक्कम १८ लाख रुपये होती. अभिनेत्री मेघा धाडे हा सिझन जिंकली होती. मेघाला प्रायोजकांकडून व्हिलासुद्धा मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरेला १७ लाख रुपये मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT