kiran mane, bigg boss marathi, kiran mane daughter SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: किरण मानेंची मुलगी दिग्दर्शनात.. बापानेच शेयर केला लेकीचा पोस्टर

किरण मानेंची मुलगी आता वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दिग्दर्शनात उतरत आहे.

Devendra Jadhav

बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ५ पर्यंत मजल मारणारे अभिनेते किरण माने यांनी त्यांचा जबरदस्त खेळ दाखवला. माने यांनी बिग बॉस मराठी ४ मध्ये सातारचा बच्चन अशी स्वतःची ओळख सांगितली. किरण मानेंची मुलगी आता वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत दिग्दर्शनात उतरत आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर लेकीच्या नाटकाचा पोस्टर शेयर केलाय.

किरण माने यांनी सोशल मीडियावर ईशाच्या नाटकाचा पोस्टर आणि तिच्यासोबतचा फोटो शेयर केलाय. फोटो शेयर करत माने लिहितात.. ..."आपलं लेकरू नकळत आपल्या पावलावर पाऊल ठेवतं तवा मन किती भरून येतं ते शब्दांत नाय सांगू शकत. माझी मुलगी ईशा हिनं लिहीलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'पारंबी' या संहितेचा पहीला प्रयोग सादर होतोय. उद्या, रविवार २२ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता नामदेव सभागृह, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे. मी येतोय. तुम्हीही जमलं तर नक्की या. नाट्यक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवू पहानार्‍या माझ्या गुंड्याला भरभरून शुभेच्छा द्या !"

किरण माने बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी तडफदार खेळ करत फायनल पर्यंत मजल मारली. किरण माने टॉप ३ स्पर्धक होते. बिग बॉस मराठी ४ मध्ये किरण माने यांची विकास सावंत सोबतची मैत्री दिसली. याशिवाय राखी सावंत सोबत असलेली मानेंची केमिस्ट्री घरात आणि घराबाहेर चर्चेत राहिली.

काही दिवसांपूर्वी किरण माने यांची साताऱ्यात भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत बायको, मुलगा - मुलगी आणि संपूर्ण कुटुंबीय या आलिशान सोहळ्यात सहभागी होते. महिलांनी किरण माने यांना ओवाळलं. किरण माने यांचे मित्रमंडळी आणि साताऱ्यातील तमाम जनता या सोहळ्याला सहभागी होती. किरण माने यांनी ओपन जीप मधून हात दाखवत सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कराल नाद तर व्हाल बाद अशा घोषणा करत आणि बॅनरबाजी करत किरण मानेंची मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स चमकले?

Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीला मिठाशी संबंधित 'या' गोष्टी करा, आर्थिक अडचणी दूर होतील

Latest Marathi News Live Update : मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये २५ तृतीयपंथियांनी विष घेतले

Pakistan Semi Final Scenario WC: पाकिस्तानची 'नौका' श्रीलंकेतच बुडणार! उपांत्य फेरी सोडाच, हे तर तालिकेत तळावरच राहणार

Viral Video: मुंबईत राम मंदिर स्टेशनवर ‘थ्री इडियट्स’चा खऱ्या आयुष्यात सीन, व्हिडिओ कॉलवर झाली प्रसूती... 'हा' ठरला रँचो

SCROLL FOR NEXT