Akshay Kelkar Sakal
मनोरंजन

Akshay Kelkar: आईनेच लावुन दिली सेटिंग! खुप मजेदार आहे ‘बिग बॉस’ विजेता अक्षयच्या पहिल्या प्रेमाची कहाणी

‘बिग बॉस’ 4 मराठीच्या घरात गेल्या तीन महिन्यात खुप कही घडले. बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार , याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

सकाळ डिजिटल टीम

‘बिग बॉस’ 4 गेल्या शंभर दिवसांपासून रंगत असलेला कलर्स मराठी वरील शोचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. ‘बिग बॉस’ 4 मराठीच्या घरात गेल्या तीन महिन्यात खुप कही घडले. बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार , याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर ठरला. तसेच दुसऱ्या स्थानावर अपूर्वा नेमळेकरला समाधान मानावे लागले. अभिनेता अक्षय केळकरला बिग बॉसची ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार रुपये मिळाले.

अक्षय बद्दल क्वचितच कोणाला माहित असेल, बिग बॉसचा विजेता अक्षयचा जन्म 16 मार्च रोजी ठाण्यातील कळवा येथे झाला. त्याने कळव्याच्या सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वांद्रे येथे कमर्शिअल आर्ट्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अक्षयचे कला दिग्दर्शक होण्याचं स्वप्न होतं आणि त्याने मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

बिग बॉसच्या घरात असताना अक्षय केळकरने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अक्षय सतत चर्चेत असायचा. अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केली आहेत. अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. त्यावेळेस त्याने “माझ्या आयुष्यातलं पहिले प्रेम आईने जुळवून दिले होते” असे म्हणाला होता.

“मी सुरुवातीपासूनच खूप लाजाळू होतो. मी त्यावेळी मुलींबरोबर जास्त बोलायचो देखील नाही. माझ्या नात्यातली एक मुलगी त्यावेळस मला खूप मेसेज करायची. मी ते मेसेजेस टाळत होतो. एकदा आईने माझा फोन चेक केला. आईने ते मेसेजस पाहिले आणि आई म्हणाली, ही मुलगी तुला मेसेज करत आहे, तिला तू आवडत असशील. नात्यातील होती म्हणून मी त्या मुलीच्या घरी राहायला देखील गेलो. आमच्यात खूप चर्चा झाली.मी तिला आवडत असल्याची तिने कबुली दिली. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण ते प्रेम टिकलं नाही. ब्रेकअप झाले". माझ्या आयुष्यातले पहिले प्रेम आईने जुळवून दिले होते”, असे अक्षयने त्यावेळी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: सुरतमध्ये अपहरण, मुंबईत संपवलं; पण कुणी? कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात सापडलेल्या ५ वर्षीय मुलाच्या मृतदेहाचं कोडं उलगडलं

'Vaibhav Suryavanshi ला फार सल्ले द्यायला जाऊ नका...', रायुडू असं का म्हणाला? वाचा

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Palghar News: भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT