video viral
video viral  
मनोरंजन

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंची 'स्टँड अप कॉमेडी'

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे नेते केशव उपाध्ये (Bjp keshav Upadhye) हे सध्या चर्चेत आले (social media video viral) आहे. आपल्या परखड भूमिकेसाठी आणि आग्रही मत मांडण्यासाठी सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या उपाध्येंचा एक हटके व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत. एरवी विरोधकांवर कडाडून टीका करणाऱ्या उपाध्येंच्या त्या व्हिडिओला आतापर्यत नेटकऱ्यांकडून लाईक्स, कमेंट्स आल्या आहेत. झी मराठीवर सुरु झालेल्या एका कार्यक्रमामध्ये उपाध्ये यांनी सहभाग घेतला असून यावेळी त्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय नेटकऱ्यांना करुन दिला आहे.

काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील (entertainment) सेलिब्रेटींसाठी झी मराठी स्टँड अप कॉमेडीचा कार्यक्रम सुरु केला आहे. यामध्ये आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी सहभाग घेतला आहे. उपाध्ये यांनी सोशल मीडियावरुन आपल्या त्या कार्यक्रमातील एक छोटीशी झलक व्हायरल केली आहे. स्टँड अप कॉमेडी सादर करण्यापूर्वी त्यांनी आपण पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयत्न करत असल्याचे प्रेक्षकांना सांगितलं आहे. मात्र ज्यावेळी उपाध्ये यांनी सादरीकरणाला सुरुवात केली तेव्हा ते एखाद्या सराईत कलाकारासारखे सादरीकरण करत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना त्यावेळी उपस्थित असणाऱ्या परिक्षकांकडून चांगली दाद मिळाली आहे.

उपाध्ये यांनी आपल्या स्टँड कॉ़मेडीमध्ये एका निवडणूकीतला किस्सा शेयर केला आहे. त्यावेळी त्यांनी उभे केलेले विनोदी प्रसंग, त्यांची शैली प्रेक्षकांना भावली आहे. निवडणूकीला साहेब उभे होते. त्यांचा कधीही पराभव झाला नाही. मात्र त्या निवडणूकीत ते पडले. त्याचं कारण म्हणजे.....हे उपाध्ये यांनी त्यांच्या शैलीत मोठ्या गंमतीदारपणे शेयर केले आहे. त्यावर त्यांना उपस्थितांकडून टाळ्यांची दादही मिळाली आहे. आतापर्यत पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेलवरुन विरोधकांवर टीका करणाऱ्या उपाध्येंचा हा वेगळा लूक त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी पर्वणी ठरताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT