Bobby Deol
Bobby Deol 
मनोरंजन

बाबाजी जाने मन की बात, 'चुकीमुळे तीन वर्ष नैराश्यात'

सकाळ डिजिटल टीम

Web Serise: आश्रम या मालिकेतून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या अभिनेता बॉबी देओलनं त्याच्या प्रवासाविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. (Aashram Web Serise) बरसात पासून बॉलीवूड प्रवासाला सुरुवात (Entertainment News) करणाऱ्या बॉबीला मोठ्या अडचणींना सामोरं जावं (Bollywood News) लागलं होतं. त्याबद्दल त्यानं सांगितलं आहे. आपण आपल्याच चूकीमुळे तीन वर्षे मानसिक तणावात असल्याचा खुलासा देखील बॉबीनं (Bobby Deol) केला आहे. प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम या मालिकेतून बॉबी पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आला आहे. या मालिकेचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Bollywood Actor Bobby Deol Bollywood Journery)

मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे नैराश्यामध्ये गेलो होतो. त्याला कारणीभूतही मीच होतो. माझा स्वभाव, त्याचा परिणाम माझ्या कामावर झाला होता. यासगळ्या प्रसंगातून मला जर कुणी बाहेर काढले असेल तर ती व्यक्ती मी स्वताच होतो. हे फार कमी जणांना माहिती आहे. माझ्या कुटूंबियांना देखील माझ्या बाबत होणाऱ्या प्रसंगानं वाईट वाटत होत. त्यांनीही मला प्रेरणा दिली. मात्र यासगळ्यातून मीच वाट काढली. आणि यासगळ्यातून मला मार्ग काढावा लागला होता. तीन वर्षे मी नैराश्यात काढली. त्यातून अनेक गोष्टी मला नव्यानं शिकता आल्या. त्याचा फायदा मला पुढील करिअरसाठी झाला.

माझा बॉलीवूडमधील प्रवास काही सोपा नव्हता. माझ्याविषयीच्या अनेक गोष्टी चूकीच्या पद्धतीनं लोकांसमोर आल्या आहेत. त्याचाही मला फटका बसला आहे. विशेष म्हणजे अनेकांचे ज्या वयात करिअर उतरणीला लागते तेव्हा माझ्या वाटयाला यश आले आता यात कोणाला दोष देणार, मात्र त्यावरुन देखील लोकं जेव्हा तुम्हाला ट्रोल करायला लागतात तेव्हा वाईट वाटते. मी आतापर्यत खूप चढ उतार पाहिले आहेत. आताचा बॉबी देओल आणि गेल्या 15 वर्षांत मी यश आणि अपयश पाहिले आहे. तेव्हा जे कोणी नावं ठेवतात त्यांच्याकडे मी फारशा गांभीर्यानं पाहत नाही. मी माझ्या अनुभवातून माझं ध्येय गाठलं आहे. अशी भावना बॉबीनं व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: "जेल किंवा पक्षबदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते," शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा

Ajit Pawar: 'मी शरद पवारांचा मुलगा असतो तर?', जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले, 'अजूनही काही...'

Akshaya Tritiya 2024 : सुवर्ण नगरी जळगावच्या अस्सल सोन्याची भुरळ ब्रिटीशांनाही पडली होती!

Lok Sabha Election: 'दोन बायका असणाऱ्यांना 2 लाख रुपये देऊ'; निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्याचं आश्वासन.. राजकारण तापलं

MSC Aries: भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणखी एक विजय, 5 खलाशांची इराणकडून सुटका

SCROLL FOR NEXT